चोरट्यास रोख रकमेसह अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:17 IST2021-06-27T04:17:00+5:302021-06-27T04:17:00+5:30

चोरी करून पळून जाणाऱ्या एका युवकाला तारदाळ येथील ठाकरे चौकात पेट्रोलिंग करणाऱ्या शहापूर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी ...

The thief was arrested with cash | चोरट्यास रोख रकमेसह अटक

चोरट्यास रोख रकमेसह अटक

चोरी करून पळून जाणाऱ्या एका युवकाला तारदाळ येथील ठाकरे चौकात पेट्रोलिंग करणाऱ्या शहापूर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने रुई येथील एका ऑफिसमधून 1 लाख 7 हजार 320 रुपये चोरल्याचे कबूल केले. अक्षय साताप्पा वडर (वय 22, रा तारदाळ) असे त्याचे नाव आहे. या केलेल्या कामगिरीबाबत पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी टीमला 10 हजार रुपये बक्षीस जाहीर केले.

अधिक माहिती अशी, रुई येथील शरीफ मकुभाई यांनी बांधकामाकरिता 1 लाख 7 हजार 320 रुपये ऑफिसमध्ये आणून ठेवले होते. ते चोरीस गेले. याबाबत शरीफ यांचे वडील बाळासोा यांनी तक्रार देण्यासाठी हातकणंगले पोलीस ठाणे गाठले. दरम्यान, शुक्रवारी रात्री चोरी करून अक्षय हा तारदाळमार्गे निघाला होता. त्यावेळी शहापूर पोलीस त्यावेळी पेट्रोलिंग करत असताना त्याच्या हालचाली संशयित आढळून आल्या. त्याच्याकडे रोख रक्कम आढळून आल्याने त्याच्याकडे अधिक विचारपूस केली. मात्र, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याला पोलिसांनी ठाण्यात आणून अधिक चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. ही कारवाई पांडुरंग गुरव, दीपक माने, महेश कांबळे व होमगार्ड साताप्पा कुंभार आदींनी केली.

Web Title: The thief was arrested with cash