बाप्पाच्या गळ्यातील चांदीच्या दागिन्यांवर चोरट्याचा डल्ला
By सचिन भोसले | Updated: September 22, 2023 17:40 IST2023-09-22T17:39:24+5:302023-09-22T17:40:24+5:30
संभाजी नगरातील घटना : अर्धा किलो चांदीच्या हाराचा समावेश.

बाप्पाच्या गळ्यातील चांदीच्या दागिन्यांवर चोरट्याचा डल्ला
सचिन भोसले, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : संभाजीनगर रेस कोर्स नाक्यावरील आयडियल स्पोर्ट्स क्लब मंडळाच्या गणेश मूर्तीच्या अंगावरील अर्धा किलो वजनाचा चांदीचा हार चोरट्याने लंपास केला. ही घटना शुक्रवारी सकाळी ७.३० ते ९.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी कार्यकर्ते झोपायला होते. मात्र, चोरट्याने पाळत ठेवून कार्यकर्ते नसल्याचे संधी साधत ही चोरी केली. याबाबत फेऱ्या याबाबतची फिर्याद मंडळाची कार्यकर्ते सिद्धार्थ संजय पाटील (वय २२, संभाजीनगर) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात नोंदवली.
संभाजी नगरातील रेस कोर्स नाक्यावरील आयडियल स्पोर्ट्स क्लब या मंडळाच्या मंडपात गणेश उत्सवानिमित्त गणेश मूर्ती ची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या मूर्तीवर अंदाजे ३५ हजार रुपये किमतीचा अर्धा किलो वजना चा तीन फूट लांबीचा व मध्यभागी मोठे पेंडल व त्यावर लाल रंगाचा खडा व दोन्ही बाजूस लहान फुले असलेला ती चांदीच्या साखळीने जोडलेले असलेला हा हार घालण्यात आला होता. मंडळाचे कार्यकर्ते २४ तास मंडपात असतात मात्र, शुक्रवारी सकाळी ते स्नान करून येण्यासाठी गेले असता चोरट्याने ही संधी साधत चांदीच्या हारावर डल्ला मारला. ही बाब स्नान करून आलेल्या कार्यकर्त्यांना समजल्याने परिसरात गोंधळ उडाला. मंडळाच्या कार्यकर्त्यांसह परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली. चोरट्याने पाळत ठेवून ही चोरी केल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती. याबाबतचा गुन्हा पोलिसात नोंद झाला आहे. या चोरीची घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्परतेने तपासात सुरुवात केली आहे.