शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

हेल्मेट, रेनकोट घालून आले, चाकूचा धाक दाखवून २३ तोळे दागिने लुटले; कोल्हापुरातील उद्योजकाच्या बंगल्यात जबरी चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 18:13 IST

जिल्ह्यात नाकाबंदी, सम्राटनगरातील घटना, दोन चोरट्यांचे कृत्य

कोल्हापूर : लक्ष्मी लाडा पंप कंपनीचे मालक राजू जयकुमार पाटील (वय ६०, रा. गोविंदराव हौसिंग सोसायटी, सम्राटनगर) यांच्या घरात घुसून आजोबांना चाकूचा धाक दाखवत दोन चोरट्यांनी २३ तोळे दागिने ठेवलेले डिजिटल लॉकर लुटले. हा प्रकार गुरुवारी (दि. १२) दुपारी तीन ते सव्वातीनच्या दरम्यान घडला. भर दुपारी घडलेल्या जबरी चोरीमुळे शहरात एकच खळबळ उडाली. रात्री उशिरापर्यंत जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करून चोरट्यांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते.घटनास्थळ आणि राजारामपुरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजू पाटील, त्यांची पत्नी, मुलगा आणि सून हे चौघे नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी कंपनीत गेले होते. पाटील यांचे व्याही (सुनेचे वडील) शीतल सौंदते (वय ८३) हे एकटेच बंगल्यात होते. बंगल्याचा मुख्य दरवाजा बाहेरून बंद होता. दुपारी तीनच्या सुमारास बंगल्याचे मागील दार उघडून दोन चोरटे आत शिरले. त्यातील एकाने सौंदते यांच्या गळ्याला चाकू लावला, तर दुसरा चोरटा थेट वरच्या मजल्यावर गेला. कपाटांमधील साहित्य विस्कटून त्याने चीज वस्तू आणि रोकडचा शोध घेतला. कपाटातील दागिन्यांचे डिजिटल लॉकर चोरट्याच्या हाती लागले. लॉक निघत नसल्याने लॉकर पिशवीत घालून तो खाली आला. त्यानंतर दोघे मागील दरवाजाने निघून गेले. काही वेळात सौंदते यांनी फोन करून याची माहिती मुलगी आणि जावयास दिली. पाटील कुटुंबीयांनी तातडीने घराकडे धाव घेऊन पाहणी केली असता, २३ तोळे दागिन्यांच्या डिजिटल लॉकरची चोरी झाल्याचे लक्षात आले.घटनेची माहिती मिळताच राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुशांत चव्हाण सहकाऱ्यांसह पाटील यांच्या बंगल्यात पोहोचले. श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञांनी चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात फारसे यश आले नाही. भर दुपारी झालेल्या जबरी चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत फिर्याद दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.हेल्मेट अन् रेनकोटकाळ्या रंगाचे हेल्मेट, रेनकोट आणि स्पोर्ट् शूज घातलेले दोन चोरटे चंदेरी रंगाच्या मोपेडवरून आले होते. अवघ्या १५ मिनिटांत दागिन्यांची लूट करून ते पसार झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

जिल्ह्यात नाकाबंदीलूट करून पळालेल्या चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांनी शहर आणि जिल्ह्यात नाकाबंदी केली आहे. सीसीटीव्ही फुटेजमधून मिळालेल्या माहितीनुसार चोरट्यांचे वर्णन सर्व पोलिस ठाण्यांना कळविण्यात आले आहे. राजारामपुरी पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या चार पथकांकडून चोरट्यांचा शोध सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.कामगारांकडे चौकशी सुरूपाटील यांच्या घरात पाच पुरुष आणि तीन महिला कामगार आहेत. यातील तिघांकडे चौकशी सुरू आहे. चोरट्यांनी आजोबा सौंदते यांना कोणतीही इजा केली नाही. चोरटा थेट दागिने असलेल्या खोलीत पोहोचला. यावरून दोन्ही चोरट्यांना पाटील यांच्या घराची माहिती असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. त्यामुळेच पाटील यांच्या घरातील कामगारांची चौकशी सुरू असल्याचे निरीक्षक चव्हाण यांनी सांगितले.