शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: विनाशिक्षिका शाळांमध्येही मुलींशी होणार संवाद, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी घेतली दखल

By समीर देशपांडे | Updated: September 13, 2025 12:47 IST

जिल्ह्यातील ७०० प्राथमिक शाळा या विनाशिक्षिका असून या शाळांमधील मुलींनी समस्या मांडायच्या कोणाकडे असा प्रश्न ‘लोकमत’ने शुक्रवारच्या अंकात उपस्थित केला होता

समीर देशपांडे कोल्हापूर : जिल्ह्यातील ७०० प्राथमिक शाळा या विनाशिक्षिका असून या शाळांमधील मुलींनी समस्या मांडायच्या कोणाकडे असा प्रश्न ‘लोकमत’ने शुक्रवारच्या अंकात उपस्थित केला होता. याची दखल घेत सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी शुक्रवारच्या बैठकीत याबाबत पर्याय काढण्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यांना सूचना केल्या. त्यानुसार आठवड्यातून किमान एखादा दिवस या मुलींशी संवाद साधण्यात येणार असल्याचा उपक्रम कोल्हापूरजिल्हा परिषद राबवेल, असे कार्तिकेयन यांनी स्पष्ट केले आहे.कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या एकूण १९५८ शाळांपैकी तब्बल ७०० शाळांमध्ये शिक्षिका नाहीत. त्यामुळे अनेकवेळा शाळेतील मुलींना त्यांच्या आरोग्यापासून ते वैयक्तिक अनुभवाविषयी बोलायचे असेल तर शिक्षकांशी बोलताना मर्यादा येतात. आपल्या बाईंशी एखादी विद्यार्थिनी जितक्या मोकळेपणाने बोलू शकेल तसे शिक्षकांबाबत होऊ शकत नाही. शिक्षिकांच्या व्यक्तिमत्त्वाचाही मोठा प्रभाव मुलींवर होत असतो. त्यामुळेच हा विषय शुक्रवारच्या अंकामध्ये ‘लोकमत’मधून मांडला होता. याबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी लक्ष घालावे, अशीही अपेक्षा व्यक्त केली होती.

वाचा- शिकायचं, मागच्या बाकावर नाही बसायचं; कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ‘नो मोर बॅक बेंच’ संकल्पनासहपालकमंत्री माधुरी मिसाळ या शुक्रवारीच कोल्हापूरच्या दौऱ्यावर होत्या. त्यांनी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीतच त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांना याबाबत विचारणा केली. तेव्हा शासनाच्या धोरणानुसार प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या होत असल्याने त्यावर थेट नियंत्रण नसल्याची वस्तुस्थिती सांगण्यात आली. तेव्हा मिसाळ यांनी पर्याय काढण्याची सूचना कार्तिकेयन यांना केली. त्यानुसार आठवड्यातून एकदा शनिवारी त्या ठिकाणी एक तास या शाळांमधील मुलींशी संवाद साधण्याचा उपक्रम राबविण्यात येईल, असे कार्तिकेयन यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

तर राज्यात असा निर्णय घेणारा पहिला जिल्हा कोल्हापूरराज्यातील सर्वच जिल्ह्यात अशा पद्धतीने विनाशिक्षिका हजारो शाळा आहेत. जर कोल्हापूर जिल्हा परिषदेने या विनाशिक्षिका शाळा असलेल्या शाळांमध्ये मुलींशी साप्ताहिक संवाद उपक्रमाला सुरुवात केली तर असा उपक्रम राबविणारा कोल्हापूर हा राज्यातील पहिला जिल्हा ठरणार आहे.