हज यात्रेसाठी जिल्'ातून २८९ भाविक जाणार; प्रशिक्षण शिबिर उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 07:22 PM2020-01-21T19:22:25+5:302020-01-21T19:23:55+5:30

कोल्हापूर : जिल्'ातून हज यात्रेसाठी यंदा २८९ भाविक जाणार आहेत. यासाठी मुंबई हज हाऊस येथे २०२० मध्ये हज यात्रेसाठी ...

 There will be 90 devotees from the district for Haj pilgrimage | हज यात्रेसाठी जिल्'ातून २८९ भाविक जाणार; प्रशिक्षण शिबिर उत्साहात

हज यात्रेसाठी जिल्'ातून २८९ भाविक जाणार; प्रशिक्षण शिबिर उत्साहात

Next

कोल्हापूर : जिल्'ातून हज यात्रेसाठी यंदा २८९ भाविक जाणार आहेत. यासाठी मुंबई हज हाऊस येथे २०२० मध्ये हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांच्या यादीतील कोटा आणि ड्रॉ निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार निवड झालेल्या जिल्'ातील हज यात्रेकरूंचे मंगळवारी कोल्हापूर जिल्हा हज कमिटीद्वारे प्रशिक्षण शिबिर दसरा चौक येथील मुस्लिम बोर्डिंगमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.

या मार्गदर्शन शिबिरात यात्रेकरूंकरिता पासपोर्ट, वैद्यकीय सेवा, विमानतळ ते हजपर्यंतची विविध कार्ये कशी करावीत; यासोबतच तेथे पोहोचल्यानंतर धार्मिक विधी कसे करावेत, आदींबाबत संपूर्ण माहिती देण्यात आली. त्याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शक हाजी इकबाल देसाई, हाजी दिलावर बालिंगे, जाफर बाबा सय्यद, नजीर मेस्त्री, आझम तांबोळी, कय्युम बागवान, मंजूर पाचपुरे, हंजेखान शिंदी, अब्दुल हमीद मीरशिकारी, अमीर गडकरी, नूर मुजावर, आदिल देसाई, आदींनी मार्गदर्शन केले. यानंतरचे मार्गदर्शन शिबिर २३ फेबु्रवारी २०२० रोजी होणार आहे.

जिल्'ातून हज यात्रेसाठी विविध माध्यमांतून ६४४ जणांनी हज समितीकडे अर्ज केले होते. त्यांतून ड्रॉद्वारे २३१ अधिक ज्येष्ठ नागरिक ५८ अशा २८९ जणांची हज यात्रेला जाण्यासाठी निवड करण्यात आली आहे. या शिबिरासाठी २८९ यात्रेकरूंपैकी २७६ जण उपस्थित होते.

  • कोल्हापुरातील दसरा चौक येथील मुस्लिम बोर्डिंग येथे हज यात्रेकरूंसाठी मंगळवारी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते.


 

 

Web Title:  There will be 90 devotees from the district for Haj pilgrimage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.