शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीची उमेदवारी टीव्हीवरुनच कळाली, शरद पवार यांचा गौप्यस्फोट

By पोपट केशव पवार | Updated: May 2, 2024 12:15 IST

'या जागेबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये कोणतीच चर्चा झाली नाही'

कोल्हापूर : जिथे ज्यांचे उमेदवार निवडूण येऊ शकतात अशा जागांवर दुसऱ्याने आग्रह न करता ती जागा जिंकू शकणाऱ्या पक्षाला द्यायची असे महाविकास आघाडीत ठरले होते. राज्यातील सर्वच जागांवर अशा पध्दतीने उमेदवार ठरवण्यात आले. मात्र, सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवार ठरवताना कोणतीच चर्चा केली नाही. तेथील उमेदवारी आम्हाला थेट टीव्हीवरील बातम्यांमधूनच कळाली, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याची मागणी होत असताना शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या जागेवर चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली. यानंतर काँग्रेसचे विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी करत बंडखोरी केली. याकडे लक्ष वेधले असता शरद पवार यांनी या जागेबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये कोणतीच चर्चा झाली नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, 'राज्यात महाविकास आघाडीचे उमेदवार ठरवताना कुणी जास्त जागा मागायच्या नाहीत असे ठरले होते. कोणत्या पक्षाचा उमेदवार तेथे निवडून येऊ शकतो ती जागा त्या पक्षाला द्यायची या सुत्रानुसार उमेदवार निश्चित करण्यात आले. मात्र, याला सांगली लोकसभा मतदारसंघ अपवाद ठरला. येथील उमेदवारी आम्हाला थेट टीव्हीवरुनच कळाली. कोण उमेदवार आहे हेही टीव्हीवरुनच समजला. पण, एकदा निर्णय घेतला आहे म्हंटल्यावर आम्ही या निर्णयाच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत'.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरsangli-pcसांगलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Sharad Pawarशरद पवारvishal patilविशाल पाटीलShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस