शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
3
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
4
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
5
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
6
"गोविंदा फक्त माझा आहे, आम्हाला कोणीच...", घटस्फोटांच्या चर्चांना सुनीता अहुजाने लावलं पूर्णविराम
7
शाळेची फी भरण्यास उशीर, सहावीच्या विद्यार्थ्याला एका खोलीत नेलं आणि...; शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
8
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
9
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
10
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
11
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
12
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
13
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
14
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
15
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
16
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
17
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
18
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
19
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
20
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप

उद्योगांसाठी विशेष पॅकेज नाही

By admin | Updated: March 1, 2016 00:35 IST

केंद्रीय अर्थसंकल्प : व्याजदर, करात सवलतींची उद्योजकांची अपेक्षा ठरली फोल

शिरोली : अर्थसंकल्पात उद्योगांना फारसे विशेष कोणतेही पॅकेज अथवा करात कोणतीही सूट दिलेली नाही. उद्योगांना समाधानकारक अर्थसंकल्प नाहीे; पण शेती, मूलभूत सुविधा, रस्ते, जलसंवर्धन यांना पॅकेज जाहीर केल्याने पुढील काळात उद्योग सुधारतील, असे उद्योजकांना वाटते.गेल्या दोन वर्षांपासून उद्योगांना मोठी मंदी आली आहे. या मंदीमधून बाहेर पडण्यासाठी केंद्र सरकार सोमवारी झालेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटली हे उद्योगांना व्याज दरात, टॅक्सेसमध्ये सवलती देतील, अशी अपेक्षा उद्योजकांना होती, पण तसे काहीच झाले नाही, लघु आणि मध्यम उद्योगांना करात काही प्रमाणात सवलत देण्यात येणार आहे. देशात नवीन उद्योग यावेत, उद्योग वाढावा, लोकांना काम मिळावे म्हणून नवीन उद्योग सुरू करण्यासाठी एक दिवसात परवाना मिळणार आहे. नूतनीकरण तत्काळ मिळणार आहे. नवीन उद्योग सुरू करण्यासाठी कुशल मनुष्यबळ लागते, हे मनुष्यबळ देण्याचे काम शासन करणार आहे, तसेच तीन वर्षे कामगारांचा फंड शासनाने भरण्याचा निर्णय घेतला आहे. पाच कोटीपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या लघु आणि मध्यम उद्योगांना करात सवलत देण्यात आली आहे. हा थोडासा लघु आणि मध्यम उद्योगांना दिलासा आहे, पण दुसरीकडे वाहन खरेदीवर टॅक्स वाढविला आहे. डिझेल वाहन खरेदीवर अडीच टक्के तर दहा लाखांच्या वरील वाहन खरेदीवर एक टक्का आणि आलिशान चारचाकी वाहनावर चार टक्के सेवा कर वाढविला आहे. त्यामुळे वाहन खरेदीला ब्रेक लागू शकतो , त्यामुळे मंदी वाढू शकते, एक एप्रिलपासून जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) लागू करण्यात येणार होता, पण तो पुन्हा एक वर्ष लांबणीवर टाकला आहे, त्यामुळे उद्योजक निराश झाले आहेत, तर जागतिक पातळीवर मंदी असल्याने निर्यात कमी झाली आहे, असे अर्थमंत्री जेटली यांनी मान्य केले आहे. हा अर्थसंकल्प सर्वसामान्य शेतकरी वर्गासाठी चांगला आहे. अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. रस्ते प्रकल्पासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. त्यामुळे पुढच्या काळात उद्योगांना कामे वाढण्यासाठी ही योजना राबविली आहे, असे वाटते, असे उद्योजकांनी सांगितले आहे. (वार्ताहर)उद्योगांना स्वतंत्र असे काही दिलेले नाही, पण लघु आणि मध्यम उद्योगांना करात सवलत दिली आहे. नवीन उद्योगांना सवलती देणार आहेत, पण कोणत्या सवलती मिळणार हे जाहीर केलेले नाही. शेतकरी वर्गाला पॅकेज जाहीर केले आहे. बँकांना पॅकेज दिले आहे. सेवाकर एक ते अडीच टक्क्यांनी वाढविला आहे. -रामप्रताप झंवर, ज्येष्ठ उद्योजक लोकांकडे पैसे आले पाहिजेत, वाहन खरेदी वाढली पाहिजे, यासाठीच शेती, रस्ते प्रकल्पासाठी, पायाभूत सुविधा यांना या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी प्राधान्य दिले आहे. लोकांकडे पैसे आले की आपोआपच उद्योग वाढीस लागेल, ही संकल्पना शासनाने ठेवली आहे. - व्ही. एन. देशपांडे, तज्ज्ञ उद्योजक