शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: जिल्हाधिकाऱ्यांच्या बोगस सहीच्या आदेशाबद्दल गांभीर्यच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 11:58 IST

नोकरभरतीचे रॅकेट : सीपीआर, पोलिस प्रशासनाचे एकमेकांकडे बोट

कोल्हापूर : जिल्हाधिकाऱ्यांच्या बोगस सहीने नोकरीचे आदेश निघाले असतानाही याचा तपास करून खरा प्रकार उघडकीस आणण्याबद्दल सीपीआरची यंत्रणा गंभीर नसल्याचे दिसत आहे. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात तक्रार देऊन १५ दिवस झाले तरी यातील नेमका दोषी समोर आलेला नसून लक्ष्मीपुरी पोलिस ठाणे आणि सीपीआर प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवत आहेत.जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांच्या सह्या असलेले दोन बोगस नियुक्ती आदेश घेऊन दोघेजण सीपीआरमध्ये पंधरा दिवसांपूर्वी आले होते. गायत्री जयवंत वारके यांना लिपिकपदी तर दिलीप गणपती दावणे यांना शिपाई पदावर सीपीआरमध्ये नियुक्त घ्यावे, अशी शिफारस आयुक्त, जिल्हा विभाग रुग्णालय कोल्हापूर यांना करण्यात आली असून यावर येडगे आणि मोरे यांच्या बोगस सह्या आहेत.याबाबत सीपीआर प्रशासनाने २१ जानेवारीला लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. परंतु १५ दिवस होत आले तरी ही पत्रे नेमकी कुणी दिली हे उघडकीस आलेले नाही. जिल्ह्याच्या प्रमुख अधिकाऱ्याची सही बोगस होते आणि तरीही तपास होत नाही हे गौडबंगाल कळेनासे झाले आहे.

पालकमंत्र्यांनी सांगूनही पुढे काहीच नाहीजिल्हा नियोजन समिती बैठकीनंतर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना या बोगस आदेशांबद्दल विचारणा करण्यात आली. तेव्हा त्यांनी तातडीने तपास करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या होत्या. परंतु त्यानंतरही पुढे काही झालेले नाही.

आम्ही सीपीआर प्रशासनाकडे या प्रकरणातील मूळ आदेशांची मागणी केली आहे. त्यांनी व्हॉटसअॅपवरील स्क्रीन शॉट दिले आहेत. बनावट आदेशाची सीपीआरकडे अर्जासोबतचा जोडलेला मूळ बनावट आदेश मिळाल्यानंतर तातडीने तपास केला जाईल. - श्रीराम कणेरकर, पोलिस निरीक्षक लक्ष्मीपुरी पोलिस ठाणे 

आमच्याकडे दोन्ही मुले नियुक्तीचे जे पत्र घेऊन आली त्याचीच प्रत लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दिली आहेत. हा कागद वगळता आमच्याकडे एकही कागद नाही. - डॉ. शिशिर मिरगुंडे, वैद्यकीय अधीक्षक सीपीआर रुग्णालय

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयcollectorजिल्हाधिकारी