शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

देशात नसलेला नियम कोल्हापुरात लावून अडवणूक का करता?, ऊस दरावरुन मंत्री हसन मुश्रीफांचा राजू शेट्टींना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 13:28 IST

कोल्हापूर : राज्य व केंद्र सरकारच्या कायद्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी उसाचा दर दिला आहे. कायद्याचे तंतोतंत पालन येथील ...

कोल्हापूर : राज्य व केंद्र सरकारच्या कायद्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी उसाचा दर दिला आहे. कायद्याचे तंतोतंत पालन येथील कारखाने करीत असताना देशात नाही तो नियम कोल्हापुरात लावून शिक्षा का देता? असा सवाल करीत कर्नाटकातील एका कारखान्याने दीड-दोन लाख टनाचे गाळप केले आहे. त्या कारखान्यांना जिल्ह्यातील ऊस जाऊ देता, मग आमचीच आडवणूक का करता? असा आरोप पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी यांना केला.ऊस दराच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत हाेते. मंत्री मुश्रीफ म्हणाले, यंदा पाऊस कमी झाल्याने उसाचे उत्पादन कमी आहे. जेमतेम तीन महिने कारखाने चालतील कामगारांना नऊ महिन्यांचा बसून पगार द्यावा लागणार आहे. ऊसतोड मजूर बसून आहेत. त्यांच्या हाताला काम नसल्याने ते परत जाऊ लागले आहेत. ही परिस्थती कारखानदारांनी कळकळून सांगितली; पण संघटना ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. कर्नाटकातील हलसिद्धनाथ, बेडकीहाळ, उगार, अथणी या कारखान्यांनी दीड-दोन लाख टनाचे गाळप केले आहे.मागील हंगामाबाबत दराबाबत काही तफावत असेल तर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची नेमणूक केली असून २१ नोव्हेंबरपर्यंत ते अहवाल सादर करतील. यामध्ये ज्या कारखान्यांना पैसे देय लागले तर जिल्हा बँक त्यांना कर्ज देईल, असेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

बेकायदेशीर केले नसताना कोण थांबणार?साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होणार का? यावर मंत्री मुश्रीफ म्हणाले, कोल्हापुरातील हजारो टन ऊस कर्नाटकात जात आहे. त्यात कायद्यानुसार शेतकऱ्यांना दर दिला आहे. बेकायदेशीर काहीच केले नसताना मग त्यांनी करायचे काय?

अशी आहे समिती..अध्यक्ष : जिल्हाधिकारी राहुल रेखावारसदस्य सचिव : प्रादेशिक साखर सहसंचालक अशोक गाडेसदस्य : पाच शेतकरी संघटना व पाच साखर कारखानदार

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेHasan Mushrifहसन मुश्रीफRaju Shettyराजू शेट्टी