शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

आत्मविश्वास नसल्यानेच भाजपकडून फोडाफोडी, काँग्रेस नेते सतेज पाटील यांचे टीकास्त्र

By पोपट केशव पवार | Updated: December 23, 2023 18:20 IST

'आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीलाच बहुमत मिळेल'

कोल्हापूर : येणाऱ्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीत भाजपला विजयाचा आत्मविश्वास नाही. त्यामुळेच ते राष्ट्रवादी, शिवसेना पक्षात फोडाफोडी करत आहेत. मात्र, त्यांनी कितीही फोडाफोडीचे राजकारण केले तरी येणाऱ्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीलाच बहुमत मिळेल, असा विश्वास माजी मंत्री, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी व्यक्त केला. काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त २८ डिसेंबरला नागपूर येथे महारॅलीचे आयोजन केले असून यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून तीन हजार कार्यकर्ते जाणार आहेत. त्याच्या तयारीसाठी आमदार पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेस कार्यालयात पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी आ.पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.तीन राज्यातील निवडणुकीतील यशामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे का? या प्रश्नावर आ.पाटील यांनी आत्मविश्वास वाढला असेल तर मग राष्ट्रवादी, शिवसेना पक्ष फोडायची गरज का भासते? असा सवाल केला. त्यांच्याकडे बहुमत असतानाही फोडाफोडी केली. याचा अर्थ, येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांना विजयाचा विश्वास नसल्याने ते फोडाफोडीचे राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.दरम्यान, बैठकीत आ.पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या. यावेळी आमदार पी.एन.पाटील, आ.जयश्री जाधव, आ.राजू आवळे, आ.जयंत आसगावकर, गोपाळराव पाटील, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, महिला जिल्हाध्यक्षा सुप्रिया साळोखे, संजय पोवार-वाईकर, बाजीराव खाडे, भारती पवार,तौफिक मुलानी, सूर्यकांत पाटील-बुध्याळकर यांच्यासह सर्व तालुकाध्यक्ष उपस्थित होते.

दिल्लीतच ठरेल लोकसभेची जागाराज्यातील लोकसभेच्या जागांसंदर्भात २९, ३० डिसेंबरला दिल्लीत बैठक होणार आहे. कोल्हापूर किंवा हातकणंगले लोकसभा मतदारसंघापैकी एक जागा काँग्रेसकडे घेण्यासंदर्भातील निर्णय तिथे होऊ शकतो, असे आ.पाटील यांनी सांगितले.

आम्ही एकसंध, मतभेद नाहीतकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविषयी पक्षात नाराजी नाही. आम्ही सर्व एकसंध असून एकीने निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे सांगत आ.पाटील यांनी पटोले यांच्याविषयी पक्षात नाराजी असलेल्या चर्चां निरर्थक असल्याचे सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलBJPभाजपा