शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रूग्णालयात एकही रूग्ण नाही

By admin | Updated: November 11, 2014 23:20 IST

डेंग्यूची साथ : आरोग्य विभागास सर्व्हेचे आदेश

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात जानेवारी ते आॅक्टोबर अखेर विविध प्रकारातील तापाचे २ लाख २२ हजार रुग्ण आढळले असून त्यात डेंग्यू ३९, लेप्टो २ तर हिवतापाचे १२१ रुग्ण आहेत. तसेच सध्या सिंधुदुर्गात डेंग्यू साथीचा फैलाव होत असला तरी जिल्हा रुग्णालयात मात्र डेंग्यूने त्रस्त एकही रुग्ण उपचार घेत नसल्याचे अहवालावरून स्पष्ट होत आहे.जिल्ह्यात ठिकठिकाणी डेंग्यूची लागण झालेले रुग्ण आढळायला सुरुवात झाली आहे. संपूर्ण राज्यभरात साथ आहे. राज्यात ठिकठिकाणी या तापाने मृत्यू झालेल्यांची संख्या मोठी असून सिंधुदुर्गात सुदैवाने मात्र अशी स्थिती नाही. असे असले तरी हिवताप विभागाच्यावतीने योग्य त्या उपाययोजना आखताना दिसून येत नाही. आरोग्य संचालक सतीश पवार यांनी आरोग्य विभागास जिल्ह्यात सर्व्हे करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच गृहभेट देण्याचेसुद्धा आदेश दिले आहेत.असे असले तरी प्रत्यक्षात कृती करणे गरजेचे आहे. आरोग्य विभागाने जास्तीत जास्त ग्रामीण तसेच शहरी भागात पोचणे आवश्यक आहे. तरच ही डेंग्यूची साथ आटोक्यात आणण्यात आरोग्य विभागास यश येईल.दहा महिन्यात तापाचे आढळले सव्वा दोन लाख रुग्णजानेवारी ते आॅक्टोबर अखेर तापाचे २ लाख २२ हजार एवढे रुग्ण आढळले होते. त्यातील लेप्टोसाठी ३ हजार ४४१ रुग्णांचे रक्त नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी दोन रुग्ण लेप्टो पॉझिटिव्ह आढळले होते. तसेच डेंग्यूची चाचणी करण्यासाठी ३ हजार ८८४ रुग्णांचे रक्त नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी ३९ रुग्ण पॉझिटिव्ह मिळाले. तसेच हिवतापाचे १२१ रुग्ण आढळले होते. यातील सर्व रुग्ण उपचाराअंती बरे झाले असून या साथीने कोणाचाही मृत्यू झालेला नाही असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.तापाचे ४१ रुग्ण उपचाराखालीजिल्हा रुग्णालयात सद्यस्थितीत तापाचे ४१ रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मात्र, हे सर्व रुग्ण साध्या तापाचे असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे असे जिल्हा रुग्णालयाचे चिकित्सक डॉ. आर. डी. माने यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)