शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

...तर गुरुवारी शिवसैनिक कर्नाटकचे नाके उखडून टाकतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2021 19:45 IST

Shiv Sena Collcator Office Kolahpur : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कोगनोळी येथे लावलेले तपासणी नाके ताबडतोब हटवण्यास कर्नाटक सरकारला सांगावे, अन्यथा उद्या, गुरुवारी शिवसैनिक ते उखडून टाकतील, असे इशारापत्र जिल्हा शिवसेनेतर्फे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना मंगळवारी देण्यात आले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना शिवसेनेचे इशारा पत्र कर्नाटकची वाहनेही महाराष्ट्राने अडवावीत

कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कोगनोळी येथे लावलेले तपासणी नाके ताबडतोब हटवण्यास कर्नाटक सरकारला सांगावे, अन्यथा उद्या, गुरुवारी शिवसैनिक ते उखडून टाकतील, असे इशारापत्र जिल्हा शिवसेनेतर्फे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना मंगळवारी देण्यात आले.

महाराष्ट्रातून महाराष्ट्रात जाणाऱ्यांना आरटीपीसीआरची सक्ती थांबवली नाही तर महाराष्ट्रातही कर्नाटकच्या वाहनांना प्रवेश देऊ नये, अशीही विनंती करण्यात आली.जिल्हाप्रमुख विजय देवणे व संजय पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन कर्नाटक सरकारकडून महामार्गावर होत असलेल्या अरेरावीची वस्तुस्थिती मांडली.

महामार्गावरून कागल, आजरा, गडहिंग्लज, चंदगड या महाराष्ट्राच्या तालुक्यातील नागरिकांची रोजची ये-जा असते, पण कोविड संसर्गामुळे कर्नाटक सरकारने गेल्या तीन महिन्यांपासून कोगनोळी नाक्यावर आणि आता दूधगंगा नदीवर तपासणी नाके बसवले आहेत. आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल असेल तरच महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांना पुढे सोडले जात आहे.

महाराष्ट्रातून महाराष्ट्र जात असणाऱ्या वाहनांचीही अडवणूक केली जात आहे. तपासणी वाढवल्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वादावादीचे प्रसंगही घडत आहे, पण नागरिकांवर दबाव टाकण्यासाठी कर्नाटक सरकारने मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तेथे तैनात केला आहे.

वास्तविक महामार्ग हा केंद्र सरकारच्या मालकीचा असतानाही कर्नाटक सरकारने तो अडवणे कितपत योग्य आहे, अशी विचारणा करत महाराष्ट्रातील जनतेची अडवणूक शिवसेना कदापिही सहन करणार नाही, असेही इशारा पत्रात म्हटले आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी कर्नाटक प्रशासनाशी बोलून घेण्यासाठी आजची बुधवारची मुदत दिली आहे. या मुदतीत समज देऊन नाके हटवले नाहीत तर शिवसेना गुरुवारी ते नाके उखडून फेकून देईल, असाही इशारा दिला. यावेळी मनजित माने, सुजित चव्हाण, शिवाजी जाधवही हे उपस्थित होते. 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूरKarnatakकर्नाटक