'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा

By राजाराम लोंढे | Updated: May 16, 2025 20:03 IST2025-05-16T20:00:29+5:302025-05-16T20:03:32+5:30

ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाची चर्चा होत आहे. या पुस्तकात एक मुद्दा उद्धव ठाकरे महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यानंतर मुख्यमंत्री बनले. त्यावेळी गृहमंत्री कुणाला करायचे यासंदर्भातील आहे.

'...then Hasan Mushrif would have become the Home Minister in the Mawiya government'; Sanjay Raut's explosive claim in his book | '...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा

'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा

- राजाराम लोंढे, कोल्हापूर
खासदार संजय राऊत यांनी "नरकातला स्वर्ग" या पुस्तकात वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विषयी लिहिले आहे. या पुस्तकामध्ये राऊतांनी गृहमंत्री करण्यासंदर्भात एक महत्त्वाचा गौप्यस्फोट केला आहे. 'महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होताना गृहमंत्री पदाबाबत अनेक नावांवर चर्चा झाली, यामध्ये कोल्हापूरचा तगडा गडी हसन मुश्रीफ हेच योग्य होते. पण, ते मुस्लीम असल्याने त्यांना टार्गेट होईल याची भीती शरद पवार यांना होती’, असे राऊतांनी पुस्तकात म्हटले आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

ईडीने अटक केल्यानंतर संजय राऊत यांनी शंभर दिवसांच्या तुरुंगवासात हे पुस्तक लिहिले आहे. पुस्तकाच्या पान नंबर १०२ वर "महाविकास आघाडी सरकारचे बाळंतपण साधे नव्हते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर गृहखाते कोणाकडे जाणार यावर पैजा लागल्या."

भुजबळांना व्हायचे होते गृहमंत्री

"अजित पवार पहाटेचा शपथविधी आटोपून रिक्त हस्ते पुन्हा स्वगृही परतले होते. त्यांचा विचार होईल, असे मला वाटले नव्हते. छगन भुजबळ हे तुरुंगातून सुटून आले तरी त्यांच्यावर खटले चालू होते. भुजबळ यांची गृहमंत्री होण्याची इच्छा प्रबळ होती. त्यांच्यात क्षमताही होती पण त्यांच्या तुरुंग प्रवासाची अडचण ठरली असावी", असे राजकीय गौप्यस्फोट राऊतांनी पुस्तका केले आहेत. 

वाचा >>"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला

"जयंत पाटील यांना गृहमंत्रिपदाची जबाबदारी नकोच होती. 'तो एक थँकलेस जॉब आहे,' असे त्यांचे म्हणणे होते. वळसे-पाटील यांच्या प्रकृतीच्या कुरबुरी होत्या", असे राऊतांनी लिहिले आहे. 

हसन मुश्रीफांबद्दल राऊतांच्या पुस्तकात काय?
 
"कोल्हापूरचा हसन मुश्रीफ हा एक रांगडा व तगडा गडी. मुश्रीफ हे एक उत्तम चॉईस ठरले असते. परंतु ते मुसलमान असल्याने प्रत्येक गोष्टीत त्यांना टार्गेट केले जाईल, अशी भीती पवारांना वाटली. खरं तर मुश्रीफ हे कमालीचे पुरोगामी. पक्के निधर्मी आणि दिलखुलास व्यक्तिमत्त्व. शाहू महाराजांवर अपार श्रद्धा असलेले कार्यकर्ते. पण शेवटी धर्म आडवा आला", असे संजय राऊतांनी पुस्तकामध्ये लिहिले आहे.

Web Title: '...then Hasan Mushrif would have become the Home Minister in the Mawiya government'; Sanjay Raut's explosive claim in his book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.