शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
3
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
4
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
5
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
6
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
7
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
8
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
9
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
10
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
11
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
12
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
13
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
14
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
15
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
16
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
17
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
18
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
19
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...

Kolhapur Politics: ..तर या निवडणुकीचा अर्जसुद्धा भरणार नाही : मंत्री हसन मुश्रीफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 18:08 IST

''माझा कंटाळा आला असेल, तर स्पष्ट सांगा''

कागल : गेली २५ वर्षे तुम्ही मला आमदारकी दिली. या काळात १९ वर्षे मंत्रीपदी राहिलो. आपला आमदार भेटावा ही सर्वसामान्य जनतेची अपेक्षा असते. जनसंपर्कामध्ये कधीही कमतरता ठेवली नाही. सामान्यातील सामान्य अगदी एक जरी माणूस येऊन म्हणाला की, मी घरात असून भेटलो नाही किंवा फोन उचलला नाही, तर या निवडणुकीचा अर्जसुद्धा भरणार नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.कागल गडहिंग्लज उत्तुर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा येथील शाहू हाॅलमध्ये आयोजित करण्यात आला होता, तेव्हा मंत्री मुश्रीफ बोलत होते. सातव्यांदा विधानसभा निवडणुकीला सामोरा जात आहे. गेल्या सहा निवडणुकांप्रमाणेच या निवडणुकीतही मला आशीर्वाद द्या. तुमचा भाऊ आणि मुलगा समजून ओट्यात घ्या आणि मायेची उब द्या, असे भावनिक आवाहनही त्यांनी केले. यावेळी युवराज पाटील, नवीद मुश्रीफ, वसंतराव धुरे, शशिकांत खोत, प्रकाश गाडेकर, सिद्धार्थ बन्ने, तात्यासाहेब पाटील, प्रवीणसिंह भोसले, बाळासाहेब तुरबे आदी मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्यात कागल शहरातील समरजीत घाटगे यांचे कार्यकर्ते देवराज बेळीकट्टे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. विजय काळे, चंद्रकांत पाटील, किरण कदम भय्या माने यांचीही भाषणे झाली. नितीन दिंडे यांनी स्वागत, तर संजय चितारी यांनी आभार मानले.

माझा कंटाळा आला असेल, तर स्पष्ट सांगामंत्री मुश्रीफ म्हणाले माझा तुम्हाला कंटाळला आला असेल, तर जरूर स्पष्टपणे सांगा. दुसरा कुणीतरी उमेदवार काढू. माझ्या चुकासुद्धा तोंडावर सांगा, माफी मागेन. लोकप्रतिनिधी म्हणून जनतेचे शंभर टक्के समाधान करता येत नाही. परंतु, काही राहून गेले असल्यास जरूर सांगा, ते पूर्तता करण्याचाही प्रयत्न करू, असे म्हणताच वातावरण भावनिक झाले. यावर उपस्थितीत कार्यकर्त्यांनी नाही नाही असा गजर केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkagal-acकागलHasan Mushrifहसन मुश्रीफ