शेंडा पार्क प्रयोगशाळेच्या इमारतीत चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:24 IST2021-05-27T04:24:55+5:302021-05-27T04:24:55+5:30

कोल्हापूर : येथील शेंडा पार्कमधील राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेच्या इमारतीचे नूतनीकरण सुरू असताना तेथील सुमारे २५ ...

Theft in the Shenda Park lab building | शेंडा पार्क प्रयोगशाळेच्या इमारतीत चोरी

शेंडा पार्क प्रयोगशाळेच्या इमारतीत चोरी

कोल्हापूर : येथील शेंडा पार्कमधील राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेच्या इमारतीचे नूतनीकरण सुरू असताना तेथील सुमारे २५ हजारांची चोरी झाल्याची तक्रार राजारामपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शेडा पार्कमधील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेच्या इमारतीचे नूतनीकरणाचे काम मोहनलाल नरसिंगराव चौधरी (रा. दोरिमना, जि. बाडमेर, रा. राजस्थान) यांना देण्यात आले आहे. यासाठी येथे फर्निचर काम सुरू आहे. अज्ञात चोरट्याने इमारतीच्या खोलीतील काचेची खिडकी उचकटून आत प्रवेश केला. चोरट्याने आतील प्लायवूड मिनी कटर मशीन, दोन ड्रील मशीन, हॅमर मशीन, एक राऊटर मशीन, टूल बॉक्स या साहित्यासह महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेली. याबाबत चौधरी यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली आहे.

Web Title: Theft in the Shenda Park lab building