चोरी, तेही दारात ठेवलेल्या दागिन्यांची !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:21 IST2021-01-18T04:21:22+5:302021-01-18T04:21:22+5:30

कोल्हापूर : चोरी होऊ नये म्हणून सोन्याचे दागिने तिजोरीत वा लॉकरमध्ये ठेवतात. पण येथे तर चक्क घराच्या दारातच पाण्याच्या ...

Theft, pretty much the jewelry kept in the door! | चोरी, तेही दारात ठेवलेल्या दागिन्यांची !

चोरी, तेही दारात ठेवलेल्या दागिन्यांची !

कोल्हापूर : चोरी होऊ नये म्हणून सोन्याचे दागिने तिजोरीत वा लॉकरमध्ये ठेवतात. पण येथे तर चक्क घराच्या दारातच पाण्याच्या चावीशेजारी प्लास्टिकच्या बरणीत दागिने वाळत ठेवणे म्हणजे चोरट्यांना आमंत्रणच होय. असाच प्रकार करवीर तालुक्यातील कुडित्रे गावी घडला. सुमारे ५० हजार रुपये किमतीचे दागिने असलेली प्लॉस्टिकची बरणी दारात वाळण्यासाठी ठेवली अन् चोरट्यांनी हीच संधी साधत ती चोरुन नेल्याची घटना घडली.

कुडित्रे (ता. करवीर) येथे पवित्रा नारायण भास्कर (वय ६०) यांनी घरासमोर रस्त्यावर असलेल्या पाण्याच्या चावीजवळ पन्नास हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असणारी प्लास्टिकची बरणी वाळत ठेवली होती. त्या बरणीत काळ्या मण्यांमध्ये गुंफलेले सोन्याचे १८ मणी व नवलखच्या मण्यांसोबत सोन्याच्या वाट्या असलेली ५ ग्रॅम वजनाची ३५ गोल मण्यांची बोरमाळ होती. अज्ञाताने ती बरणी उघडून त्यातील सोन्याचे दागिने चोरुन नेले. या चोरीची तक्रार भास्कर यांनी करवीर पोलीस ठाण्यात दिली आहे.

Web Title: Theft, pretty much the jewelry kept in the door!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.