शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रुम एकच, दिली दोघा ग्राहकांना; हिऱ्याच्या बांगड्यांची झाली चोरी, बेळगावमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 12:26 IST

हॉटेलमधून एक ग्राहक आपल्या रूमला लॉक करुन बाहेर पडला. दरम्यान दुपारी येथील कर्मचाऱ्यांनी हॉटेलमध्ये आलेल्या जोडप्याला शेजारची रूम देण्याऐवजी तीच रूम दुसऱ्या ग्राहकाला दिली. त्यामुळे नेमकी चोरी कोणी केली? हा प्रश्न.

चंदगड : हाँटेल व्यवस्थापनाच्या भोगळ कारभारामुळे रुममधून एका ग्राहकाच्या हिऱ्याच्या बांगड्या चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. व्यवस्थापकाने एकच रुम दोघा ग्राहकांना दिल्याने मोठा गोंधळ उडाला. याप्रकरणी हाँटेल व्यवस्थापकासह एका जोडप्यावर गुन्हा दाखल झाला आहे. बेळगावमधील काकती येथे ही घटना घडली.ओलम अँग्रो इंडिया प्रा. लि. गुरगाव  (हरियाणा)  या कंपनीच्या राजगोळी (ता. चंदगड) येथील साखर कारखान्याच्या एच.आर विभागप्रमुख क्षिप्रा बिजावत या कामानिमित्त बेळगावजवळील काकती येथील हाँटेल मेरिएटमध्ये वास्तव्यास होत्या. यावेळी रुममधून त्यांच्या हिऱ्याच्या बांगड्यांची चोरी झाल्याची घटना मंगळवारी (दि.१५) उशिरा घडली. याप्रकरणी बुधवारी (दि.१६) काकती पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.क्षिप्रा बिजावत या कामानिमित्त बेळगावजवळील काकती येथील हाँटेल मेरिएटमध्ये वास्तव्यास होत्या. हाँटेलमधील  २१९ क्रमांकाच्या रुममध्ये साहित्य ठेवून मंगळवारी सकाळी त्या राजगोळी खुर्द येथील साखर कारखान्याकडे गेल्या होत्या. रात्री त्या परतल्या त्यावेळी खोलीतील हिऱ्याच्या दोन बांगड्या गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी हाँटेल व्यवस्थापनाला कळविले. सुरुवातीला कोणीच याची दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांनी काकती पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी रुमची झडती घेतली. पण क्षिप्रा ज्या रूम वास्तव्यास होत्या ती रुम कर्मचाऱ्यांनी तीन तासासाठी दुसऱ्या जोडप्याला दिल्याचे समोर आले.चोरी नेमकी केली कुणी?क्षिप्रा यांनी हॉटेलमधून बाहेर पडताना आपल्या रूमला लॉक लावले होते. दुपारी येथील कर्मचाऱ्यांनी हॉटेलमध्ये आलेल्या जोडप्याला शेजारची रूम देण्याऐवजी तीच रूम त्या दुसऱ्या ग्राहकाला दिली. तीन तास हे जोडपे हॉटेलमध्ये होते. त्यामुळे नेमकी चोरी कोणी केली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. काकतीचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश ए. वाय. पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKarnatakकर्नाटकhotelहॉटेलCrime Newsगुन्हेगारी