मार्केट यार्डमधून कांद्यापाठोपाठ आता गुळाची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:56 IST2020-12-05T04:56:21+5:302020-12-05T04:56:21+5:30
कोल्हापूर : येथील शाहू मार्केट यार्डातील गूळ व्यापाऱ्यांच्या गोडावूनमधून गुळाचे रवे चोरीस गेल्याचा प्रकार उघडकीस आला. गेल्याच महिन्यात कांद्याचे ...

मार्केट यार्डमधून कांद्यापाठोपाठ आता गुळाची चोरी
कोल्हापूर : येथील शाहू मार्केट यार्डातील गूळ व्यापाऱ्यांच्या गोडावूनमधून गुळाचे रवे चोरीस गेल्याचा प्रकार उघडकीस आला. गेल्याच महिन्यात कांद्याचे भाव गगनाला भिडले असताना येथून कांद्याच्या पोत्यांची मोठ्या प्रमाणात चोरी झाली होती.
कोल्हापुरातील मार्केट यार्डात व्यापाऱ्यांच्या गोदामातून शेतकऱ्यांच्या मालाच्या चोरीच्या घटनामध्ये वाढ होत आहे. गेल्याच महिन्यात कांद्याची भाववाढ झाली असताना एकाच व्यापाऱ्याच्या गोदामातील कांद्याच्या पोत्यांची सलग दोन दिवस चोरी केली होती. त्यानंतर आता एका व्यापाऱ्याच्या गोदामातील गुळाचे रवे चोरीला गेल्याचा प्रकार घडला आहे. त्याबाबत व्यापाऱ्याने गुरुवारी रात्री शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत याबाबत चोरीची तक्रार देण्याचे काम सुरू होते.
(तानाजी)