प्रतिभानगरातून चारचाकीची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:58 IST2020-12-05T04:58:04+5:302020-12-05T04:58:04+5:30
कोल्हापूर : वाहनचोरीचे सत्र काही केल्या थांबेनासे झाले आहे. प्रतिभानगरात घराच्या दारात उभी केलेली चारचाकी अज्ञात चोरट्यांनी पळविली. वाहनमालक ...

प्रतिभानगरातून चारचाकीची चोरी
कोल्हापूर : वाहनचोरीचे सत्र काही केल्या थांबेनासे झाले आहे. प्रतिभानगरात घराच्या दारात उभी केलेली चारचाकी अज्ञात चोरट्यांनी पळविली. वाहनमालक राजेश रत्नाकर पाटील (वय ५०, रा. प्रतिभानगर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार शुक्रवारी राजारामपुरी पोलिसांत गुन्हा नोंद झाला.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी पाटील यांनी आपल्या मालकीची पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर यादरम्यान राहत्या घरासमोर उभी केली होती. या कालावधीत वाहनमालक पाटील हे बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्याने ही चारचाकी चोरून नेली. दरम्यान, मध्यवर्ती बसस्थानक ते परीख पूल या रस्त्यावर उभी केलेली दुचाकी चोरट्याने भरदिवसा चोरून नेली. याबाबत दुचाकीमालक मदन विश्वनाथ बागल (रा. राजारामपुरी ) यांनी तक्रार दिली. त्यानुसार शाहूपुरी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला.