शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कत्तलखान्यात जाणाऱ्या गाईला 'जीवदान' दिले, कोल्हापुरातील तरुणांनी 1500 लोकांना जेवू घालून 'डोहाळेजेवण' केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 17:47 IST

दुर्वा दळवी  कोल्हापूर : कत्तलखान्यात जाणाऱ्या गाईला 'जीवदान' देवून जयसिंगपुरातील काही प्राणीप्रेमींनी तिचे संगोपन केले. इतकेच नाही तर 1500 ...

दुर्वा दळवी कोल्हापूर: कत्तलखान्यात जाणाऱ्या गाईला 'जीवदान' देवून जयसिंगपुरातील काही प्राणीप्रेमींनी तिचे संगोपन केले. इतकेच नाही तर 1500 लोकांना जेवू घालून 'डोहाळेजेवण' देखील केले. प्राणीप्रेमी तरुणांनी केलेल्या या कामाचा सर्वांनी आदर्श घ्यावा असाच आहे. या डोहाळेजेवणांची सर्वत्र चर्चा सुरु असून तरुणांनी केलेल्या कामाचे कौतुक होत आहे.गेल्या वर्षी एक गाय अशक्त झाली होती. यामुळे मालकाने आपले नुकसान होणार म्हणून तिला कत्तलखाण्यात द्यायचे ठरवले. पण याच वेळेस जयसिंगपूर येथील काही तरुण देवासारखे धावून गेले. त्यांनी या गायीला ताब्यात घेऊन तिचे संगोपन केले. शाहू नगर समडोळे मळा येथील व्ही बॉईज चौक मंडळाच्या तरुणांनी ज्याला जसे जमेल तसे गायीचा सांभाळ केला. यामुळे गायीची तब्येत चांगली सुधारली.दरम्यान ही गाय गाभण राहिल्याची आनंदाची बातमी सर्वांना कळली. मग तरुणांनी गायीचा ओटी भरण्याचा कार्यक्रम मोठ्या थाटात करायचे ठरवले. काल, बुधवारी मंडळाने चौकात मंडप घातला अन् राधा गायीला फुलांच्या माळांनी सजवून याठिकाणी आणण्यात आले. मग सुवासिनी महिलांनी वाजत गाजत गारवा आणून प्रेमाने गायीला साडी, फळे देऊन ओटी ही भरली. आपल्या घरच्या कार्यक्रमासारखा प्रत्यकाचा उत्साह इथे दिसून येत होता. त्यांनतर सायंकाळी सुमारे 1500 हून अधिक माणसांचे यावेळी गोडधोडाचे सुग्रास असे जेवण तयार करण्यात आले. विशेष म्हणजे गाईची ओटी भरण्यासाठी प्राणी प्रेमींना खास आमंत्रण यावेळी मंडळाने दिले होते. राधा गायीचा हा अनोखा असा डोहाळ जेवणाचा मोठ्या थाटामाटात पार पडलेला कार्यक्रम खरेतर सगळ्यांना नवा आदर्श देणारा ठरला. गायीचा जीव वाचवून भूतदया दाखवून देणाऱ्या तरुणांचे आता भरभरून कौतुक होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcowगाय