शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: वरात बघायला निघाला, अन् अपघातात जागीच ठार झाला; आजऱ्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 12:42 IST

समोरून विरुध्द दिशेने आलेल्या मोटरसायकलस्वाराने दिली जोरदार धडक

सदाशिव मोरेआजरा : आजऱ्यात वरात पाहण्यासाठी जात असताना आजरा पेट्रोल पंपासमोर झालेल्या मोटरसायकलच्या अपघातात विकास महादेव पाटील (वय २० रा. देऊळवाडी ता.भुदरगड) हा युवक जागीच ठार झाला. ही घटना काल, रविवारी (दि.२३)रात्रीच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद अभिषेक संजय पोतणीस (रा. सातेवाडी ता. आजरा ) यांनी आजरा पोलिसात दिली आहे.पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अभिषेक पुतणीस व विकास पाटील हे दोघेही आजऱ्यातील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करतात. रात्री हॉटेलमधील काम संपल्यानंतर ते आपल्याकडील मोटरसायकलने वरात पाहण्यासाठी जात होते. यावेळी समोरून विरुध्द दिशेने आलेल्या मोटरसायकलस्वार जितेंद्र रामचंद्र नवार ( रा.आवंडी  वसाहत, ता. आजरा ) याने जोराची धडक दिली. यामध्ये विकास पाटील गाडीवरून रस्त्यावर पडला. त्यांच्या डोकीला गंभीर दुखापत झाल्याने घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. अपघातात अभिषेक पोतणीस यांच्या पाठीला व हातालाही दुखापत झाली आहे. जखमी दोघांना तातडीने आजरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच विकासचा मृत्यू झाला. आज सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अपघाताची व विकास मयत झाल्याची माहिती देऊळवाडीत समजताच नातेवाईकांनी  ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात प्रचंड गर्दी केली होती. विकासच्या पश्चात आई-वडील, तीन विवाहित बहिणी व एक भाऊ असा परिवार आहे. अधिक तपास पो.हे.काॅ. संतोष गस्ती करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघात