शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: वन्यप्राण्यांना पाणी पाण्यासाठी दहा लाख खर्चून बंधारे बांधले, वर्षापूर्वीच कामाचे पितळ उघडे पडले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 18:51 IST

जानेवारीतच थेंबसुद्धा नाही, चौकशी करण्याची निसर्गप्रेमींची मागणी

सरदार चौगुलेपोर्ले तर्फ ठाणे : वनहद्दीत वन्यप्राण्यांनी पाण्याची सहज उपलब्धतास व्हावी, या उद्देशाने पोर्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथील ब्राह्मणाच्या खोरीतील ओढ्याला घातलेल्या बंधाऱ्यातील पाणी उन्हाळ्यापूर्वीच आटल्याने बंधाऱ्याच्या कामाबाबत निसर्गमित्रांनी साशंकता व्यक्त केली आहे. हिवाळ्यातच बंधाऱ्यात पाण्याचा ठणठणाट असल्याने वनविभागाने प्रायोगिक तत्त्वावर उभारलेला बंधाऱ्याचा प्रयोग फसला असल्याची चर्चा आहे. दहा लाख खर्चून बांधलेल्या बंधाऱ्याचे काम निकृष्ट झाले आहे की पाणी साठविण्याची जागा चुकीची निवडली, याची सखोल चोकशी करावी, अशी मागणी निसर्गमित्रांनी केली आहे.एप्रिल २०२४ मध्ये पन्हाळा वनविभागाने पोर्ले तर्फ ठाणे, पडसाळीसह पोंबरे येथे ३० लाख रुपये खर्चून तीन बंधारे बांधले होते. पोंबरे आणि पडसाळी येथील ओढ्यांना पाण्याचा स्रोत असल्याने ते बंधारे आजही तुडुंब भरलेले आहेत; परंतु पोर्ले तर्फ ठाणे येथील बंधाऱ्यात पाण्याचा थेंबही साचून राहिलेला नाही. त्यामुळे वर्षापूर्वीच कामाचे पितळ उघडे पडले आहे.पाणी अडविण्यासाठी बंधारा बांधताना ओढ्याला पाण्याचा स्राेत आहे की नाही, असेल तर तो किती दिवस राहील? याची शहानिशा न करता वनविभागाने निवडलेली जागा चुकीची आहे की जिल्हा वार्षिक योजनेतून मिळालेला निधी मुरवण्यासाठी बंधारा बांधण्याची उचापत पन्हाळा वनविभागाने केली, असा सवाल निसर्गमित्राने केला आहे. या बंधाऱ्यात पाणी का साचले नाही, बंधाऱ्याच्या कामाचा दर्जा खराब आहे यांसारख्या अनेक प्रश्नांची उकल होण्यासाठी संबंधित विभागाने सखोल चोकशी करावी, अशी मागणी निसर्गमित्रांनी केली आहे.

तालुक्यातील पडसाळी आणि पोंबरे येथे बांधलेले बंधारे पाण्याने भरलेले आहे. पोर्लेच्या बंधाऱ्यातील पाणी डिसेंबरपर्यत होते. बंधाऱ्याला गळती नाही तरीसुद्धा बंधाऱ्यात पाणी साचलेले नाही. पाणी कशामुळे साचलेले नाही, याबाबत विचारविनिमय सुरू आहे. - अनिल मोहिते, पन्हाळा वनपरिक्षेत्र अधिकारी 

वनविभागाने बंधारे बांधताना स्थानिक लोकांना विचारात घेणे गरजेचे होते. त्यांनी निवडलेली जागा चुकीची आहे. दीर्घकाळ पाण्याचा स्राेत असणार ओढा डावलून मुरूम खुदाईमुळे विस्तीर्ण झालेल्या ओढ्यावर बंधारा बांधला आहे. मुरमाच्या जमिनीवर बंधारा बाधून १० लाखांचा निधी पाण्याबरोबर मुरविण्याचे काम वनविभागाने केले आहे. त्याची चौकशी होणे गरजेचे आहे. - दिनकर चौगुले, निसर्गमित्र, पोर्ले/ ठाणे, ता. पन्हाळा

टॅग्स :kolhapurकोल्हापूरforestजंगलWaterपाणीforest departmentवनविभाग