शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सातारा-कागल रस्त्याचे सहापदरीकरण दिवाळीला सुरू, नितीन गडकरींनी घेतला आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 14:26 IST

कोल्हापूरच्या प्रवेशद्वारावर बहुचर्चित बास्केट ब्रीज होणार असल्याचे महाडिक यांनी नमूद केले

कोल्हापूर : सातारा-कागल महामार्गाचे सहापदरीकरणाचे काम दिवाळीच्या दरम्यान सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत देण्यात आली. महाराष्ट्रातील महामार्गांच्या कामाबाबत राज्यातील सर्व खासदारांची बैठक झाली. त्यास खासदार संजय मंडलिक, धनंजय महाडिक, धैर्यशील माने, सांगलीचे संजयकाका पाटील, साताऱ्याचे श्रीनिवास पाटील, उदयनराजे भोसले उपस्थित होते. गडकरी यांनी राज्यातील नव्या महामार्गांच्या बांधणीचा आढावा घेतला.या बैठकीत खासदार महाडिक यांनी, सातारा ते कागल सहापदरीकरणाचे काम रखडले असल्याबद्दल लक्ष वेधले. सर्वाधिक वर्दळ असलेल्या या महामार्गाचे सहापदरीकरण लवकरात लवकर होणे आवश्यक असल्याची गरज त्यांनी मांडली. त्यावर गडकरी यांनी या कामाबाबतची सध्यस्थिती सांगितली. सातारा ते कागल महामार्गाच्या सहापदरीकरणासाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, १२ कंपन्यांनी निविदा भरल्या आहेत. लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुमारे साडेचार हजार कोटी रुपयांच्या कामाला दिवाळीच्या दरम्यान प्रत्यक्ष सुरुवात होईल असे गडकरी यांनी स्पष्ट केले.

बास्केट ब्रीज होणारचकोल्हापूरच्या प्रवेशद्वारावर बहुचर्चित बास्केट ब्रीज होणार असल्याचे महाडिक यांनी नमूद केले आहे. या कामाचा याच सहापदरीकरणाच्या कामात समाविष्ट आहे. त्यामुळे बास्केट ब्रीजचे कामही लवकरच सुरू होणार आहे. हा बास्केट ब्रीज पूर्ण झाल्यावर महापुराच्या काळातही, महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहील. शिरोली नाक्याकडून कोल्हापुरात प्रवेश करताना, प्रशस्त रस्ता तयार होईल. त्यामुळे कोल्हापूरच्या सौंदर्यातही भर पडणार आहे. गडकरी यांनी या कामाकडे विशेष लक्ष दिल्याचे महाडिक यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकNitin Gadkariनितीन गडकरी