शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उसंत; पंचगंगेची पातळी फुटाने कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 16:06 IST

अद्याप २८ बंधारे पाण्याखाली : पाच मार्गावरील वाहतूक बंद 

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने उसंत दिल्याने नद्यांच्या पाणी पातळीत घट झाली आहे. पंचगंगा नदीची पातळी दिवसभरात फुटाने कमी झाली असली तरी अद्याप २८ बंधारे पाण्याखाली आहेत. दोन राज्ये तर तीन प्रमुख जिल्हा मार्गावरील वाहतूक बंद राहिल्याने वाहतूक काहीसी विस्कळीत झाली आहे.गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर कमी आहे. शुक्रवारी सकाळी ऊन पडले होते. त्यानंतर ११ वाजता जोरदार सरी कोसळल्या, पण दिवसभर उघडीप राहिली. धरणक्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाल्याने नद्यांच्या पातळीत घट होत आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजता पंचगंगा नदीचे पाणी २६ फुटांवर होते, ते सायंकाळी ५ वाजता २५ फुटापर्यंत खाली आले होते.शुक्रवारपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असला तरी प्रत्यक्षात पाऊस झालाच नाही. जिल्ह्यात भात व नागलीच्या रोप लागणीच्या कामाला गती आली आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात ६ खासगी मालमत्तांची पडझड होऊन १ लाख ७६ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

जांबरे धरण भरले..चंदगड तालुक्यात घटप्रभा पाठोपाठ जांबरे धरणही पूर्ण क्षमतेने भरले आहे. या धरणाची क्षमता ०.८२० टीएमसी आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसriverनदी