शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरकरांसाठी खुशखबर! थेट पाईपलाईनचे पाणी जॅकवेलमध्ये पोहोचले, लवकरच जलवाहिनीची चाचणी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 11:58 IST

योजनेतील एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला

कोल्हापूर : कोल्हापूर शहरासाठी राबविण्यात येत असलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या जॅकवेलमध्ये धरणातीलपाणी पोहोचल्याने या योजनेतील एक महत्त्वाचा टप्पा शुक्रवारी पूर्ण झाला. गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात पावसाचा जोर असून धरणातील पाणी जॅकवेलपर्यंत पोहोचले.यावर्षी काळम्मावाडी धरण क्षेत्रात काम करण्यास भरपूर दिवस मिळाल्याने योजनेचे काम गतीने पूर्ण होत आहे. धरण क्षेत्रात जॅकवेलचे काम राहिले होते, ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदाराला देण्यात आल्या होत्या. हे काम पूर्ण झाले असून मागच्या आठवड्यात कॉपर डॅम तोडण्यात आला. त्यामुळे जॅकवेलमध्ये पाणी येण्याची प्रतीक्षा लागून राहिली होती. ही प्रतीक्षा गुरुवारी रात्री संपली. जॅकवेलमध्ये पाणी आल्यामुळे एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला. चाचणी म्हणून एका छोट्या पंपांद्वारे पाणी उपसाही शुक्रवारी करण्यात आला.धरण क्षेत्रातील अडथळ्याची सर्व कामे पूर्ण पूर्ण झाली आहेत, आता त्यावर उपसा पंप जोडण्याची कामे सुरु झाली आहे. बिद्री येथील भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याच्या कामालाही शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. योजनेवरील २० किलोमीटर जलवाहिनीची चाचणी पूर्ण झाली आहे. योजनेची सर्व कामे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण करण्याचा ठेकेदाराचा प्रयत्न असून १५ ऑगस्टपर्यंत संपूर्ण योजनेची चाचणी घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणीDamधरण