शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

अजबच! बेशुध्द रुग्णच धडाधड बोलला; पोलिसाचा महापराक्रम, रुग्णाच्या मृत्यूनंतर खरा प्रकार उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 14:03 IST

मृत्यूशी झुंज देणाऱ्या रुग्णाने चक्क जबाबही दिला, लेखी जबाबावर सहीसुध्दा केली. असा अजब प्रकार कोल्हापुरात समोर आला

तानाजी पोवारकोल्हापूर : अपघातात गंभीर जखमी होऊन बेशुध्दावस्थेत सीपीआर रुग्णालयात मृत्यूशी झुंज देणाऱ्या रुग्णाने चक्क जबाबही दिला, लेखी जबाबावर सहीसुध्दा केली. असा अजब प्रकार सीपीआर रुग्णालयात घडला. दोन दिवसांनी संबंधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर खरा धक्कादायक प्रकार उघड झाला. रुग्ण बेशुध्दावस्थेत असताना तपासातील करवीर पोलीस ठाण्याच्या एका महाप्रतापी पोलिसाने स्वत:च जबाब लिहिला, त्यावर त्या पेशंटच्या नावाची सही करण्यास त्याच्याच जावयाला भाग पाडले. आता रुग्णच मृत झाल्यानंतर घटनेचा उलगडा झाल्याने पोलीस वर्तुळात खळबळ माजली आहे.एखादा अपघात घडला की अनेकवेळा जखमी आणि आरोपी यांच्यात तडजोड होते, मी स्वत:च गाडीवरून पडलो आदी जबाब देऊन जखमी कोणाविरोधातही तक्रार देत नाहीत; पण कळंबा (ता. करवीर) येथील सेवानिवृत्त कर्मचारी आपल्या मोपेडवरून आंबेवाडी (ता. करवीर) येथे दिंडीतील वारकऱ्यांना भोजन देण्यासाठी जात होते. वडणगे फाटा येथे त्यांचा अपघात झाल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना बेशुध्दावस्थेत तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल केले.करवीर पोलीस ठाण्यातील पोलीसही चौकशीसाठी आले. त्यावेळी नातेवाईक रुग्णाला खासगी रुग्णालयात नेण्यासाठी गडबड करत होते. चौकशीसाठी आलेल्या महाप्रतापी पोलिसाने स्वत:च एका कागदावर जबाब लिहिला, त्यामध्ये मी भोवळ आल्याने पडलो, माझी कोणाविरुध्द तक्रार नाही, असा जबाब लिहून त्यावर संबंधित रुग्णाच्या नावे त्याच्याच जावयाला सही करण्यास भाग पाडले.

दरम्यान, खासगी रुग्णालयात रविवारी सायंकाळी संबंधित रुग्ण मृत झाल्याने हा प्रकार उजेडात आला. त्यावेळी, पोलिसाने बेशुध्द रुग्ण असलेल्या माझ्या सासऱ्याचा स्वत:च जबाब लिहून मलाच त्यांच्याच नावे सही करण्यास भाग पाडल्याची तक्रार जावयाने करवीर पोलीस स्टेशनमध्ये सोमवारी सायंकाळी केली. त्यामुळे बेशुध्द रुग्णाचा जबाब कसा घेतला? याबाबत वरिष्ठांनी संबंधित पोलिसांची कानउघडणी केली. या खोट्या जबाबाच्या प्रकारामुळे पोलीस ठाण्यात खळबळ माजली.‘मीच पडलो, माझी काही तक्रार नाही’संबंधित पोलिसाने चौकशीवेळी लिहिलेच्या जबाबामध्ये, ‘मला अचानक भोवळ आली, मी गाडी पेट्रोलपंपावर थांबवली, भोवळ आल्याने मी खाली पडलो, लोकांनी मला सीपीआर रुग्णालयात दाखल केले. आता माझी तब्येत ठीक आहे. वरील घटनेबाबत माझी कोणाविरोधातही तक्रार नाही’ असा जबाब लिहून त्याखाली रुग्णाच्या नावाची सही आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिसAccidentअपघात