शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्हा परिषदेतील अपहारप्रकरणी तत्कालीन लेखाधिकाऱ्यास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 17:38 IST

शालेय पोषण आहार योजनेची रक्कम स्वयंपाकी आणि मदतनीस यांच्या खात्यावर वर्ग करण्याऐवजी स्वतःच्या आणि नातेवाइकांच्या खात्यावर २८ लाख रुपये वर्ग केली

कोल्हापूर : शालेय पोषण आहार योजनेची रक्कम स्वयंपाकी आणि मदतनीस यांच्या खात्यावर वर्ग करण्याऐवजी स्वतःच्या आणि नातेवाइकांच्या खात्यावर २८ लाख ८९ हजार रुपये वर्ग करून अपहार केल्याचा आरोप असलेला तत्कालीन लेखाधिकारी दीपक बाळासाहेब माने (वय ४४) याला बुधवारी शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. माने जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षण विभागात ‘शालेय पोषण’कडे लेखाधिकारी म्हणून कार्यरत होता.पोलिसांनी सांगितले की, सन २०२१ ते २०२४ या कालावधीत २८ लाख ८९ हजारांची रक्कम डेटा एंट्री ऑपरेटर तेजस्विनी साठे यांनी स्वतःसह नातेवाइकांच्या खात्यावर वर्ग केली होती. या प्रकरणी दीपक माने या लेखाधिकाऱ्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे अहवाल दिला होता. यामध्ये साठे दोषी आढळल्या. माने याच्यावरही ठपका ठेवण्यात आला होता.

शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल होऊन आठजणांना अटक केली होती. माने फरार होता. त्याला शाहूपुरी पोलिसांनी बुधवारी अटक केली. दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित असलेल्या माने याचे लोकसभा निवडणुकीदरम्यान अपहरण करून त्याला धमकी देण्यात आली होती. या प्रकरणातही राजारामपुरी पोलिसांनी आठजणांना अटक केली होती.