शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

‘राजाराम’ पाठोपाठ ‘भोगावती’, ‘मंडलीक’ची रणधुमाळी, कोल्हापूर जिल्ह्यातील आठ कारखान्यांच्या संचालक मंडळाची मुदत संपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 16:21 IST

जूनपर्यंत या कारखान्यांच्या निवडणुका घेणे प्राधिकरणापुढे अग्निदिव्य

राजाराम लोंढेकोल्हापूर : ‘कुंभी कासारी’ साखर कारखान्याचा गुलाल खाली बसतो न बसतो तोच ‘राजाराम’ साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यात ‘राजाराम’सह आठ कारखान्यांच्या संचालक मंडळाची मुदत संपलेली आहे. त्यामुळे प्राधान्याने ‘भोगावती’, ‘मंडलीक’, ‘आजरा’ या कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे. जूनपर्यंत या कारखान्यांच्या निवडणुका घेणे प्राधिकरणापुढे अग्निदिव्य आहे.गेल्या चार महिन्यात जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा नुसता धुरळा उडाला आहे. त्यात विकास, दूध, पतसंस्थांच्या निवडणुका प्राधान्याने घेतल्या आहेत. साखर कारखान्यांचे कार्यक्षेत्र मोठे असल्याने त्यांच्यासाठी यंत्रणा तुलनेत अधिक लागत असल्याने इतर निवडणुकांचा अंदाज घेऊनच कारखाना निवडणूक प्रक्रिया सुरू केली जाते. कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी कासारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत २८ डिसेंबर २०२० ला संपलेली होती.

कसबा बावडा येथील राजाराम कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत त्याच्या अगोदर म्हणजेच २० एप्रिल २०२० ला मुदत संपली आहे, मात्र न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणूक लांबणीवर पडली आहे. ‘कुंभी’ची रणधुमाळी संपली असून आता ‘राजाराम’च्या अंतिम यादीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यापाठोपाठ ‘भोगावती’, ‘बिद्री’ , ‘मंडलीक’, ‘आजरा’ या प्रमुख कारखान्यांचे बिगुल वाजणार आहेत.‘राजाराम’साठी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात मतदानछत्रपती राजाराम साखर कारखान्याची प्रारूप यादी प्रसिद्ध झाली असून त्यावर हरकती, सुनावणीची प्रक्रिया होऊन साधारणत: मार्चच्या पहिल्या आठवड्यात अंतिम यादी प्रसिद्ध होईल. तेथून प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम सुरू होऊन एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात मतदान होऊ शकते.

आठवड्यात उर्वरित कारखान्यांची प्रक्रिया शक्यसहकारी निवडणूक प्राधिकरणाकडे एप्रिल २०२१ नंतर संचालक मंडळाची मुदत संपलेल्या कारखान्यांची माहिती प्रादेशिक साखर सहसंचालकांनी पाठवली आहे. येत्या आठ-दहा दिवसात प्रक्रिया सुरू करण्याबाबत आदेश येऊ शकतात.निवडणुकीस पात्र कारखाने व संचालक मंडळाची संपलेली मुदत :कारखाना - संपलेली मुदत

  • राजाराम - २० एप्रिल २०२०
  • सह्याद्री, धामोड - १९ एप्रिल २०२१
  • इंदिरा, तांबा - १६ मे २०२१
  • आजरा - २३ मे २०२१
  • भोगावती  - २४ एप्रिल २०२२
  • गायकवाड, सोनवडे - १ मे २०२२
  • मंडलीक, हमीदवाडा - जुलै २०२२
  • बिद्री  - ऑक्टोबर २०२२
टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूक