शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

Kolhapur: उष्मा वाढला, जनावरे आटली; ‘गोकुळ’ला बसला फटका, दूध संकलनात झाली घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 13:48 IST

जर्शी, होस्टन गायींना अधिक त्रास

कोल्हापूर : जिल्ह्याचा पारा ४० डिग्रीपर्यंत पोहोचल्याने दूध उत्पादनात कमालीची घट झाली आहे. ‘गोकुळ’चे गेल्या महिन्याभरात तब्बल एक लाख लिटरने दूध संकलन कमी झाले असून, वाढत्या उष्म्यामुळे दुभती जनावरे आटू लागली आहेत. इतर दूध संघांनाही तीव्र उन्हाळ्याचा फटका यावर्षी अधिक जाणवत आहे.जिल्ह्यात यंदा फेब्रुवारीपासूनच पारा वाढू लागला आहे. प्रत्येक महिन्याला तापमानात वाढ होत असून, त्याचा जनजीवनावर परिणाम होऊ लागला आहे. उष्म्याने लहान मुले व वयाेवृद्धांना अधिक त्रास होत आहे. जनावरांच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. त्यातून दूध उत्पादन घटू लागले असून, ‘गोकुळ’चे मार्च महिन्याच्या तुलनेत १ लाख लिटरने दूध संकलन कमी झाले आहे. ‘वारणा’सह इतर खासगी दूध संघांनाही वाढलेल्या उष्म्याचा फटका बसला आहे.

जर्शी, होस्टन गायींना अधिक त्रासउष्म्याचा त्रास सर्वच जनावरांना होत असला, तरी त्यातही जर्शी व होस्टन जातीच्या गायींना अधिक जाणवतो. या गायीचे दूध झपाट्याने कमी होताना दिसत आहे.

उष्म्यापासून जनावरांचे असे संरक्षण करा :

  • जनावरांना दिवसातून किमान चारवेळा पाणी पाजा.
  • शक्यतो मुक्त गोठा पद्धतीचा अवलंब करावा
  • गोठ्यात दिवसभर गारवा राहील, असा प्रयत्न करावा.
  • जनावरांच्या अंगावर पोते भिजवून टाकावे
  • हिरवा चारा भरपूर द्यावा
  • तलाव्यात पोहण्यासाठी सोडावे
  • क्षार कमी होऊन थकवा येऊ म्हणून मिठाचे प्रमाण वाढवावे.

गेल्या चार महिन्यांतील ‘गोकुळ’चे प्रतिदिनी दूध संकलन :तारीख     -     म्हैस दूध       -      गाय दूध      -     एकूण संकलन१८ जानेवारी - १० लाख १६ हजार ८५३ - ६ लाख ९२ हजार २५४ - १७ लाख ९ हजार १०७१८ फेब्रुवारी - ८ लाख ७४ हजार ४७५ - ६ लाख ३३ हजार ५६२ - १५ लाख ८ हजार ३७१८ मार्च - ७ लाख ८० हजार २३६ - ६ लाख ४३ हजार ८७० - १४ लाख २४ हजार १०६१८ एप्रिल - ६ लाख ७६ हजार ५२९ - ६ लाख ४६ हजार ३६८ - १३ लाख २२ हजार ८९७

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा उष्मा अधिक असल्याने जनावरांना त्रास होत आहे. जनावरे आजारी पडण्याबरोबरच दुधाला कमी झाली आहेत. पशुपालकांनी जनावरांच्या गोठ्यात गारवा राहील, असे नियोजन करावे. - डॉ. वाय. ए. पठाण (उपायुक्त, पशुसंवर्धन)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGokul MilkगोकुळTemperatureतापमान