शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हप्ते थकल्याचे सांगून दुचाकी नेली, बँकेत जाऊन चौकशी केली अन्.., कोल्हापुरातील घटना

By उद्धव गोडसे | Updated: July 6, 2023 15:52 IST

कर्जदारासह बँकेचे अधिकारीही चक्रावले

कोल्हापूर : चाफोडी (ता. करवीर) येथील अतुल दिलीप कांबळे (वय २६) याने घेतलेल्या दुचाकीचे हप्ते थकल्याचे सांगून तोतया वसुली अधिका-यांनी दुचाकी लंपास केली. हा प्रकार जूनच्या पहिल्या आठवड्यात घडला. बँकेत जाऊन दुचाकीची चौकशी केली असता, हा प्रकार उघडकीस आला. बँकेचे ओळखपत्र घालून दुचाकी घेऊन गेलेले वसुली अधिकारी प्रत्यक्षात बँकेच्या वसुली पथकातील नसल्याचे समोर आल्याने कर्जदारासह बँकेचे अधिकारीही चक्रावले आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की, चाफोडी येथील अतुल कांबळे याने २०१७ मध्ये नवीन दुचाकीची खरेदी केली. त्यासाठी एका बँकेचे कर्ज घेतले होते. चार हप्ते थकल्याने जूनच्या पहिल्या आठवड्यात चार अधिकारी दारात आले. त्यांच्या गळ्यात बँकेचे ओळखपत्र होते. 'तुमचे कर्जाचे हप्ते थकले आहेत. त्यामुळे दुचाकी जप्तीसाठी आम्ही आलो आहे. दुचाकीची चावी द्या,' असे सांगून दुचाकी ताब्यात घेऊन ते निघून गेले. बँकेच्या वसुली पथकाने दुचाकी ताब्यात घेतल्याची माहिती अतुल याने बँकेच्या अधिका-यांना दिली. प्रत्यक्षात मात्र वसुली पथकाने जप्त केलेल्या वाहनांमध्ये अतुल याची दुचाकी आढळली नाही. बँकेच्या वसुली पथकाने त्याची दुचाकी आणलीच नसल्याची माहिती अधिका-यांनी दिली. त्यामुळे तोतया वसुली पथकाने दुचाकी लंपास केल्याची फिर्याद अतुल कांबळे याने करवीर पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी अनोळ‌खी चौघांवर गुन्हा दाखल केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस