शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याला राज्य सरकारने विरोध करावा, आमदार चंद्रदीप नरके यांची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 13:32 IST

कोपार्डे : अलमट्टी धरणाची उंची वाढविल्यास कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील गावे पाण्याखाली जाणार आहेत. महापुरास कारणीभूत असणाऱ्या कर्नाटकातील अलमट्टी ...

कोपार्डे : अलमट्टी धरणाची उंची वाढविल्यास कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील गावे पाण्याखाली जाणार आहेत. महापुरास कारणीभूत असणाऱ्या कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये यासाठी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी कर्नाटक शासनाबरोबर बोलणे करावे, अशी मागणी करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी नागपूर अधिवेशनात केली.नरके म्हणाले, कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यासंदर्भात कारवाई चालू केलेली आहे. सध्या ५१९.६० मीटर प्रकल्पाची पूर्ण संचित पातळी आहे. अलमट्टीची उंची वाढवून त्याची संचित पातळी ५२४ मीटर करण्याचे नियोजन कर्नाटक शासनाने सुरू केले आहे. जर अलमट्टी धरणाची उंची वाढवली तर कोल्हापूर जिल्हा आणि सांगली जिल्हा पावसाळ्यात महापुरामुळे जलमय होऊन शेती, नागरी वस्ती, पिके व गावे उद्ध्वस्त होतील. ५१९ मीटर पाणी पातळीवर कोल्हापूरचा पश्चिम भाग आणि सांगली जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती भयानक होते. उंची ५२४ मीटरवर गेली तर कोल्हापूर जिल्हा जलमय होणार आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी जमिनींचे हस्तांतरण करण्याचे काम कर्नाटक सरकारने चालू केले आहे.महापुरात कोल्हापूर आणि सांगली जिल्हा पूर्ण वाहून जाईल. त्यामुळे निश्चितपणे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी तातडीने कार्यवाही करावी. केंद्र सरकारने यामध्ये वाटाघाटी करून अलमट्टीची उंची वाढवण्याचे काम व जमिनीचे हस्तांतरण चालू आहे त्याला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनKarnatakकर्नाटकDamधरणMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकार