शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद प्रभाग रचनेचा अधिकार राज्य शासनाला नाही, कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये आज होणार पुन्हा सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 11:38 IST

तब्बल तीन तास युक्तिवाद

कोल्हापूर : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या प्रभाग रचनेचा अधिकार हा राज्य निवडणूक आयोगाला आहे. हा अधिकार राज्य शासनाला नाही, असा तब्बल तीन तास युक्तिवाद सोमवारी करण्यात आला. पुन्हा आज, मंगळवारी दुपारी याबाबत सुनावणी होणार आहे. प्रभाग रचनेच्या अधिकाराचाच मुद्दा उपस्थित झाल्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकांच्या पुढच्या प्रक्रियेविषयी नेमके काय होणार हे येत्या आठवड्यात स्पष्ट होण्याची शक्यता आहे.जिल्हा परिषदेच्या प्रभाग रचनेबाबत गेले दीड महिना न्यायालयीन कामकाज सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या करवीर, कागल आणि आजरा तालुक्यातील याचिकांचे कामकाज कोल्हापूर सर्किट बेंचच्या स्थापनेनंतर वर्ग करण्यात आले आहे. त्यानुसार ही सुनावणी सुरू असून, सोमवारी दुपारी अडीचपासून संध्याकाळी साडे पाचपर्यंत ही सुनावणी चालली. ॲड. श्रीकृष्ण गनबावले आणि ॲड. ऋतुराज पवार यांनी मुळातच रचनेच्या अधिकाराबाबतचा मुद्दा उपस्थित केला.संविधानानुसार मतदानाचा अधिकार आणि निवडणुका पारदर्शीपणे व्हायच्या असतील तर राज्य शासनाला प्रभाग रचनेचा अधिकार असून कसा चालेल असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. त्या त्या भागातील राजकीय स्थिती पाहून कुठल्या मतदारसंघाची रचना कशी करायची, कोणता भाग कुठल्या मतदारसंघातून काढायचा आणि कुठल्या मतदारसंघातून वगळायचा याचा निर्णय स्थानिक पातळीवर होत असेल तर ते योग्य होणार नाही. त्याचा परिणाम निवडणुका पारदर्शीपणे होण्यावर निश्चित होणार आहे. त्यामुळेच हा अधिकार राज्य शासनाला न देता तो राज्य निवडणूक आयोगाकडे असला पाहिजे, असा जोरकस युक्तिवाद यावेळी करण्यात आला.सरकारच्यावतीने ॲड. अनिल साखरे, ॲड. नेहा भिडे, निवडणूक आयोगाकडून ॲड. अतुल दामले, ॲड. सचिंद्र शेटे उपस्थित होते. परंतु, सोमवारी केवळ ॲड. गनबावले यांनीच युक्तिवाद केला. आता पुन्हा मंगळवारी दुपारी अडीच वाजता हा युक्तिवाद होणार आहे.

संपूर्ण राज्याचे लक्षकोल्हापूरच्या सर्किट बेंचमध्ये सुरू असलेल्या या जिल्हा परिषद प्रभाग रचनेच्या या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. रचनेच्या अधिकाराबाबत नेमका निर्णय काय लागणार यावरच सुरू असलेली प्रक्रिया पुढे सुरू ठेवायची की नाही हे ठरणार असल्याने ही सुनावणी लक्षवेधी ठरली आहे.