शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

तलाठी, मंडल अधिकारी नियुक्तीला हिरवा कंदील, 'इतक्या' जागेसाठी होणार भरती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2022 12:08 PM

नाशिक महसूल विभागात सर्वाधिक सज्जा आणि मंडळे स्थापन होणार

कोल्हापूर : राज्यात ३११० तलाठी सजे व ५१८ मंडल अधिकारी नियुक्त करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. बुधवारी त्यासंबंधीचा शासनादेश महसूल विभागाने काढला. महाराष्ट्र राज्य तलाठी महासंघाने २०१४ मध्ये नवीन तलाठी सजे व मंडल अधिकारी नियुक्त करण्याची मागणी केली होती. ती प्रत्यक्षात येण्यासाठी आठ वर्षे गेली. म्हणजेच सरकारी काम आणि सहा महिने थांब हा अनुभव खुद्द तलाठ्यांनाही आला. नाशिक महसूल विभागात सर्वाधिक ६८९ सज्जा आणि ११५ मंडळे स्थापन होणार आहेत.वाड्यांची गावे होतात, त्यातून नव्याने ग्रामपंचायती होतात. त्यामुळे तलाठ्यांच्या गरज निर्माण होते. महसूल मंडळामध्ये पाच ते आठ सजे समाविष्ट असतात. सरासरी वीस गावे एका महसुली मंडलात म्हणजेच एकाच मंडल अधिकाऱ्याकडे येतात. एकाच तलाठी व मंडल अधिकाऱ्याकडील कामाचा भार जास्त आहे. हल्ली प्रत्येक शासकीय योजनेला सात-बारा उताऱ्यापासून अनेक सरकारी कागदपत्रांची जंत्री जोडावी लागते. त्यामुळे हे उतारे मिळण्यासाठी लोकांची त्रेधातिरपीट उडते. तलाठी महासंघाने २०१४ मध्ये मागणी केल्यावर शसानाने त्यासाठी नागपूर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. त्याचा अहवाल दोन वर्षांनी २०१६ मध्ये आला. या अहवालाचा अभ्यास करून निर्णय घेण्यासाठी महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमण्यात आली. या उपसमितीने २०१७ मध्ये अहवाल दिला. त्याचवेळी मंजूर करण्यात आलेल्या पदांचा शासनादेश ७ डिसेंबर २०२२ ला निघाला.

महसुली गावनिहाय तलाठी सजे निर्माण करण्याचा शासनाचा निर्णय चांगलाच आहे. त्यामुळे लोकांना त्यांच्या त्यांच्या गावांत तलाठी भेटतील. त्यांची कामे होतील. - धनाजी कलिकते, कोल्हापूर जिल्हा तलाठी महासंघाचे नेते.

 

महसुली विभागानुसार मंजूर सजे व महसुली मंडलेपुणे - ६०२ : १००अमरावती - १०६ : १८नागपूर - ४७८ : ८०औरंगाबाद - ६८५ : ११४नाशिक - ६८९ : ११५कोंकण - ५५० : ९१

पुणे महसूल विभागपुणे - ३३१ : ५५सोलापूर - १११ : १९सातारा - ७७ : १२सांगली - ५२ : ०९कोल्हापूर - ३१ : ०५

टॅग्स :kolhapurकोल्हापूर