शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पत्नीबरोबर मोबाइलवर बोलताना आई मध्येच बोलली, रागात सुऱ्याने वार करत मुलाने केला आईचा निर्घृण खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2024 14:15 IST

साळोखे पार्कात कौटुंबिक वादातून घटना : आरोपीला अटक

कोल्हापूर : पत्नीबरोबर मोबाइलवर बोलत असताना आई मध्येच बाेलल्याचा राग आल्याने मुलाने थेट सुऱ्याने वार करुन आईचा निर्घृण खून केला. ही घटना मंगळवारी (दि. ३०) रात्री सव्वा आठच्या सुमारास कोल्हापुरातील साळोखे पार्कात घडली. शहनाज (शाहीन) राजमोहम्मद मुजावर (वय ६०, रा. साळोखे पार्क, कोल्हापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मुलगा सादिक राजमोहम्मद मुजावर (३६, रा. साळोखे पार्क) याला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली.शहरातील साळोखे पार्कात शाहीन या मुलगा सादिक व मुलीबरोबर राहत होत्या. सादिक हा टेम्पोचालक असून, त्याचा आई व बहिणीबरोबर वारंवार वाद होत होता. मंगळवारी सायंकाळी सादिक त्याच्या दुसऱ्या पत्नीबरोबर घरात मोबाईलवर बोलत असताना आई मध्येच काही तरी बोलल्याने त्यांच्यात पुन्हा वाद झाला. या रागातून सादिकने आईच्या छातीवर, पोटावर व पाठीवर सुऱ्याने तीन वार केल्याने त्या जागीच गतप्राण झाल्या.सादिकने आईवर हल्ला केल्याचे समजताच शेजाऱ्यांनी त्याच्याकडील सुरा काढून घेत राजारामपुरी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी त्याला घरातूनच तत्काळ ताब्यात घेतले. रात्री उशिरा त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

आतेभावावर पाचवेळा हल्लासादिक हा किरकोळ कारणावरून आई, बहीण व इतर नातेवाईकांबरोबर वारंवार वाद करत होता. काही दिवसांपूर्वी त्याने त्याचा आतेभाऊ जावेद मुल्ला यांच्यावरही पाचवेळा हल्ला केल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.

सर्व पोलिस ठाण्यात तक्रारीसादिकच्या अशा वागण्याने त्याच्या घरच्यांसह नातेवाईकांनी कोल्हापूर शहरातील सर्वच पोलिस ठाण्यांमध्ये तक्रारी दिल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले.

नातेवाईकांची सीपीआरमध्ये गर्दीमृत महिला शेहनाज (शाहीन) यांचा कोल्हापुरात मोठा गोतावळा आहे. या घटनेची माहिती मिळताच त्यांच्या नातेवाईकांनी सीपीआरमध्ये मोठी गर्दी केली होती. आरोपी सादिक याचा पहिल्या पत्नीबरोबर सात वर्षांपूर्वी घटस्फोट झाल्यानंतर त्याने दोन वर्षांपूर्वी दुसरे लग्न केले. दुसरी पत्नी सध्या सांगलीला गेली असून, तिच्याबरोबर तो मोबाईलवर बोलत असताना माय-लेकरांमध्ये वाद झाला. या वादातूनच ही दुर्दैवी घटना घडली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस