शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: गोठ्यात म्हशीचे रेडकू बांधण्यावरुन वाद, मुलाने केला वडिलाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 15:41 IST

हुपरी : गोठ्यात म्हशीचे रेडकू बांधण्याच्या कारणावरून वडील व मुलगा यांच्यात झालेल्या वादातून संतप्त मुलाने वडिलांच्या डोक्यात लोखंडी पाईप ...

हुपरी : गोठ्यात म्हशीचे रेडकू बांधण्याच्या कारणावरून वडील व मुलगा यांच्यात झालेल्या वादातून संतप्त मुलाने वडिलांच्या डोक्यात लोखंडी पाईप व लाकडी दांडका घातल्याने वडिलांचा जागीच मृत्यू झाला. वाद सोडविण्यासाठी गेलेल्या आजी व आईलाही मुलगा अनिलने मारहाण केल्याने यामध्ये दोघीही जखमी झाले आहेत. आप्पासाहेब कृष्णा नुल्ले (वय ७०) असे मृताचे नाव आहे, तर अनिल आप्पासो नुल्ले (४५, दोघेही रा. गंगानगर, हुपरी) असे हल्लेखोर मुलाचे नाव आहे. गुरुवारी रात्री झालेल्या मारहाणीत जखमी झालेल्या वडिलांना उपचारांसाठी शुक्रवारी सकाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अनिल हा घेऊन आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेची नोंद हुपरी पोलिसात झाली असून, अनिलवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.याबाबत माहिती अशी, शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मळेभागातील गंगानगर वसाहतीमध्ये चव्हाण कुटुंब वास्तव्यास आहे. गुरुवारी रात्री गोठ्यात बांधलेले म्हशीचे रेडकू सुटून बाहेर येऊन एकसारखे ओरडत होते. त्यामुळे वडील आप्पासाहेब यांनी मुलगा अनिल याला झोपेतून उठवून रेडकू गोठ्यात बांधण्यास सांगितले. झोपमोड झाल्याने संतप्त अनिल वडिलांबरोबर वाद घालू लागला. वाद वाढत गेल्याने संतप्त झालेल्या अनिलने जवळच पडलेल्या लोखंडी पाईप व लाकडी दांडक्याने वडिलांवर जोरदार वार केले. यामध्ये गंभीर झालेले आप्पासाहेब जमिनीवर कोसळले. हा प्रकार पाहून भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या आजी व आईलाही अनिलने दांडक्याने मारहाण केल्याने या दोघीही जखमी झाल्या आहेत. घटनेचे गांभीर्य नसलेला अनिल एवढे करूनही नंतर अगदी निवांतपणे झोपी गेला. सकाळी उठल्यानंतर आपले वडील जमिनीवर पडल्याचे व आजी आणि आई रडत असल्याचे पाहून जखमी वडिलांना घेऊन अनिल हा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आला. तेथील डॉक्टरांनी जखमी आप्पासाहेब यांची तपासणी करून त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी ही माहिती हुपरी पोलिसांना कळविली. पोलिसांनी अनिलवर अटकेची कारवाई केली. याबाबतची फिर्याद हल्लेखोर अनिलचा मुलगा अजित अनिल नुल्ले याने हुपरी पोलिसात दिली आहॆ.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस