शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील परिस्थिती नियंत्रणात, शांतता राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे - जिल्हाधिकारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2023 16:30 IST

प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही

कोल्हापूर : सोशल मीडियातून आक्षेपार्ह मेसेज व्हायरल केल्याप्रकरणी कोल्हापुरात आज, बुधवार (दि.७) सकाळपासून मोठा तणाव निर्माण झाला होता. हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्याकडून अनेक दुकानगाळे, हातगाड्या, दुचाकी तसेच काही परिसरात मोठी तोडफोड केली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार तसेच अश्रुधुराच्या कांड्याही फोडत परिस्थिती नियंत्रणात आणली. दुपारनंतर शहरातील संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आली. शहरात झालेल्या दगडफेकीच्या घटनेची जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पाहणी करत परिस्थितीची माहिती दिली. संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात असून जिल्ह्यावर प्रशासनाचे बारीक लक्ष असल्याचे ते यावेळी म्हणाले. कोल्हापुरात शांतता राखण्यासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी निश्चिंत रहावे. सोशल मिडियाव्दारे पसरणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. शहरातील आणि जिल्ह्यातील शांतता अबाधित राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन देखील जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.यावेळी बोलताना ते म्हणाले, कोल्हापूर जिल्हा हा नेहमीच सर्वधर्मसमभावाचा आणि प्रगतशील जिल्हा राहिला आहे. शाहू महाराजांचे कार्य कर्तृत्व आणि त्यांच्या विचारसरणीतून प्रेरणा घेवून आजवर कोल्हापूर जिल्ह्याने जगाला पुरोगामी आणि आधुनिकतेचा विचार  दिला आहे. जगाला आदर्श विचार देणारा हा संपूर्ण जिल्हा आहे. कोल्हापूरचा सामाजिक क्षेत्रातील ठसा कायम राखण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा, असे आवाहन करुन प्रशासनाने दिलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे सर्वांनी तंतोतंत पालन करावे, या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीची गय केली जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.अफवांना बळी पडू नये - सुनील फुलारीसोशल मिडियावरील अफवांना नागरिकांनी बळी पडू नये. तसेच अनावश्यक घराबाहेर पडून गर्दीत भर घालू नये, असे आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केले. परिस्थितीचा फायदा घेवून लोकांना घाबरवणाऱ्या व दंगा घडवून आणणाऱ्या गुंडांना शोधण्यात येत असून त्यांना अटक करण्याची कारवाई सुरु राहणार आहे. झालेल्या नुकसानीची दखल घेवून दोषींवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.सध्या स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे सर्वांनी पालन करावे. पोलिस प्रशासनाच्या वतीने नागरिकांना संरक्षण देण्यास पूर्णतः कटिबद्ध असून कोणतीही अडचण आल्यास स्थानिक पोलिस अधिकारी, पोलीस स्टेशन अथवा पोलीस प्रशासनाशी नागरिकांनी संपर्क करावा, असे आवाहनही फुलारी यांनी केले.

पालकमंत्री केसरकर परिस्थितीचा आढावा घेणारदरम्यानच, शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. दुपारी 4.30 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे त्याचे आगमन होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयात सायं. 5.30 वाजता शहरातील तणावाच्या परिस्थिती नियंत्रणाबाबत आढावा बैठक घेणार आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारीPoliceपोलिस