शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

देवस्थानचे अध्यक्षपद शिवसेनेला मिळणार?, नरकेंचे नाव चर्चेत; मंत्रिमंडळ विस्तारानंतर नियुक्ती  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 11:36 IST

भाजपकडून माजी अध्यक्ष महेश जाधव यांचेही या पदासाठी जोरदार प्रयत्न

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई, जोतिबासह कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३०६४ मंदिरांचा डोलारा सांभाळणाऱ्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद शिवसेना शिंदे गटाला मिळण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतरच त्याबाबतच्या हालचाली होतील असे दिसते. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनाच प्रशासक म्हणून एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. भाजपकडून माजी अध्यक्ष महेश जाधव यांचेही या पदासाठी जोरदार प्रयत्न आहेत.कोट्यावधींचे उत्पन्न, हजारो एकर जमिनी, आणि देवालयांचे व्यवस्थापन करणाऱ्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीवरील संचालक मंडळ दोन वर्षांपूर्वी महाविकास आघाडीच्या काळात बरखास्त करण्यात आले. तेव्हापासून तत्कालीन जिल्हाधिकारी दौलत देसाई व आता जिल्हाधिकारी रेखावार हे समितीचे प्रशासक म्हणून अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहेत. दोन वर्षांत प्रशासकांनी मंदिर हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. गेल्या वर्षभरात झालेले सत्तांतर, सरकारची अस्थिरता यामुळे कोणत्याच महामंडळावर व समित्यांवर नियुक्त्या झाल्या नव्हत्या. आता मात्र मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याने देवस्थान समितीवरील नियुक्त्यांचीही चर्चा सुरू झाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर शिवसेना शिंदे गटाकडे व शिर्डी देवस्थान भाजपला दिले जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्षपद शिंदे गटाकडे येणार आहे. अध्यक्षपदासाठी माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या नावाची चर्चा आहे. समितीतील एकूण सदस्य संख्येनुसार शिवसेना शिंदे गटाला व भाजपला विभागून जागा दिल्या जातील. मात्र मंत्रिमंडळ विस्तारानंतरच चित्र स्पष्ट होईल. याबाबत माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मी सध्या विधानसभेच्या तयारीत व्यस्त आहे, त्यामुळे देवस्थान समितीवरील नियुक्तीचा तपशील अजून माझ्यापर्यंत आला नसल्याचे सांगितले.

नरकेंचे नाव चर्चेतशिंदे गटाने शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाविरोधात बंड केल्यानंतर आमदार प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर त्यांच्यासोबत गेले. नरके यांनी तुलनेने उशिरा निर्णय घेतला. क्षीरसागर यांच्याकडे सध्या दोन पदे आहेत. आबिटकर हे कृषी परिषदेचे उपाध्यक्ष आहेत. सध्या नरके यांच्याकडे कोणतेही पद नाही. त्यामुळेच त्यांचे देवस्थान समितीच्या अध्यक्षपदासाठी नाव चर्चेत आले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv SenaशिवसेनाBJPभाजपाCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार