अतुल आंबीइचलकरंजी : येथील महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडे उमेदवारी मागण्यांसाठी भाऊगर्दी झाल्याने जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरता ठरेना, अशी स्थिती निर्माण झाली आहे. मुख्य पक्षांसह घटक पक्षांनीही अधिक जागा मागणी केल्याने आकड्यांचा मेळ बसेना. महायुती आणि शिव-शाहू दोन्हीकडे अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वच इच्छुक उमेदवार सध्या गॅसवर आहेत.इचलकरंजी महानगरपालिकेची ही पहिलीच निवडणूक होत आहे. त्यामुळे माजी नगरसेवकांसह नव्या इच्छुकांच्यात उत्सुकता वाढली आहे. परिणामी सर्वच पक्ष व स्थानिक आघाड्यांकडे इच्छुकांची संख्या वाढली आहे. हीच गोष्ट पक्षश्रेष्ठींना मुख्य डोकेदुखी ठरली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी मुख्य पक्षाच्या तसेच घटक पक्षांसोबत आणि वरिष्ठ नेत्यांसोबत अशा बैठकांच्या फेºया सुरुच आहेत. परंतु आकड्यांचा मेळ बसताना दिसत नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. पुढे प्रचारासाठी कमी कालावधी मिळणार आहे, असे असतानाही उमेदवारीचे घोंगडे भिजत पडले असल्याने इच्छुक उमेदवारांची घालमेल वाढली आहे.प्रत्येक प्रभागात ३० ते ४० जण इच्छुक उमेदवार प्रचाराला लागले आहेत. अनेकजण समाजमाध्यमांवर उमेदवारी मिळाल्याप्रमाणे जाहिरातबाजी करत आहेत. या सर्वांचा गोंधळ पाहता सर्वच प्रभागांतील मतदार बुचकळ्यात पडले आहेत. हा गेला की तो येतो, सर्वजण आपणच अधिकृत उमेदवार असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
शिव-शाहू आघाडीचे वेट अॅण्ड वॉचशिव-शाहू आघाडीत घटक पक्ष व स्थानिक गटांबरोबर चर्चेच्या बैठका सुरुच आहेत. त्यामध्येही कोणत्या पक्षाला किती जागा द्याव्यात, याबाबतची आकडेमोड सुरु आहे. त्यात महायुतीकडे इच्छुकांची गर्दी मोठी असल्याने त्यातून बंडखोरी होण्याची शक्यता आहे. तसेच त्यातील काही प्रबळ उमेदवार आपल्याकडे उमेदवारी मागू शकतात. अशांना गळाला लावल्यास तगडे आव्हान देता येईल, याचीही चाचपणी सुरू आहे. त्यामुळे सध्या वेट अॅण्ड वॉचची परिस्थिती दिसत आहे.
Web Summary : Ichalkaranji's municipal election faces seat-sharing deadlock as numerous aspirants crowd parties. Alliances struggle with allocation, creating uncertainty. Shiv-Shahu alliance adopts a wait-and-see approach, eyeing potential rebels for a stronger challenge.
Web Summary : इचलकरंजी नगर पालिका चुनाव में सीट बंटवारे पर गतिरोध है क्योंकि कई आकांक्षी पार्टियों में भीड़ कर रहे हैं। गठबंधन आवंटन के साथ संघर्ष कर रहे हैं, जिससे अनिश्चितता पैदा हो रही है। शिव-शाहू गठबंधन मजबूत चुनौती के लिए संभावित विद्रोहियों पर नजर रखते हुए, प्रतीक्षा-और-देखो दृष्टिकोण अपनाता है।