शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
2
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
3
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
4
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
5
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड
6
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
8
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
9
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
10
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
11
येस बँक घोटाळा : कपूर, अंबानी बैठका घेत; अधिकारी कार्यवाही करीत, सीबीआयकडून १३ जणांविरुद्ध गंभीर आरोप
12
चाकणकरांचे वक्तव्य हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही; अजित पवार यांची नाराजी
13
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
14
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
15
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर एकाचा हक्क नाही! मांजरेकरांच्या चित्रपटाला हायकोर्टाचा हिरवा कंदील
16
अमेरिकेत नोकरीस जाणे झाले आता अधिक कठीण; कर्मचाऱ्यांच्या स्वयंचलित मुदतवाढीची वर्क परमिट योजना बंद
17
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
18
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
19
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
20
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला

Kolhapur Crime: कारागृहातून पळालेल्या कैद्याचा तपास एलसीबीकडे, गेल्या अडीच महिन्यांपासून पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 15:07 IST

कैदी सुरेश चोथे मोकाट

कोल्हापूर : कळंबा कारागृहाच्या सर्व्हिसिंग सेंटरवरून ग्राहकाची कार घेऊन पळालेला जन्मठेपेच्या शिक्षेतील कैदी सुरेश आप्पासो चोथे (वय ३८, रा. चोथेवाडी, ता. गडहिंग्लज) याचा अद्याप पोलिसांना थांगपत्ता लागलेला नाही. गेल्या अडीच महिन्यांपासून तो पसार आहे. तो अजूनही जुना राजवाडा पोलिसांना सापडत नसल्याने पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी शनिवारी (दि. १८) याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा म्हणजेच एलसीबीकडे वर्ग केला.अनैतिक संबंधातून गडहिंग्लज तालुक्यातील एका शिक्षकाचा खून केल्याप्रकरणी सुरेश चोथे याला सिंधुदुर्ग न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तो ऑगस्ट २०२२ पासून कळंबा कारागृहात शिक्षा भोगत होता. चांगल्या वर्तनामुळे त्याला खुल्या कारागृहातील कामे दिली जात होती. २४ जुलै २०२५ रोजी कारागृहासमोरील खुल्या जागेत सर्व्हिसिंग सेंटरवर काम करताना तो ग्राहकाची कार घेऊन पळाला होता. त्याने पळवलेली कार दोन दिवसांनी कोकणात वैभववाडी येथील बाजारपेठेत एका हॉटेलसमोर पोलिसांना सापडली होती. त्याचे सीसीटीव्ही फुटेजही जुना राजवाडा पोलिसांच्या हाती लागले होते. त्यानंतर मात्र तपास रखडला. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव यासह इतर कामांमध्ये पोलिस अडकल्याने तपास होऊ शकला नाही, अशी कारणे पोलिसांकडून सांगितली जात आहेत. पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी जुना राजवाडा पोलिसांकडून आढावा घेऊन पुढील तपास एलसीबीकडे सोपवला.अडीच महिने कैदी मोकाटकैदी चोथे हा ग्राहकाची कार घेऊन थेट कोकणात गेला. वैभववाडी बाजारपेठेत कार सोडून तो पुढे निघून गेला. तो कर्नाटकातील सीमाभागात लपला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. यासाठी त्याला त्याच्या काही मित्रांनी मदत केल्याचा संशय आहे. पोलिसांकडून त्याच्या मित्रांची चौकशी होण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

कळंबा कारागृहातून पसार झालेला कैदी सुरेश चोथे याचा तपास नुकताच एलसीबीकडे आला आहे. त्याची माहिती काढण्याचे काम सुरू आहे. लवकरच त्याच्या मुसक्या आवळू. - रवींद्र कळमकर, पोलिस निरीक्षक, एलसीबी

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Jailbreak: LCB Investigates Escapee Suresh Chothe, Absconding for Months

Web Summary : Convict Suresh Chothe, escaped from Kalamba jail two months ago, remains at large. The LCB has taken over the investigation after his escape from a servicing center where he fled with a customer's car. Police suspect he may be hiding in the Karnataka border region.