शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
2
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
3
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
4
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
5
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
6
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
7
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
8
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर
9
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
10
काय वाटले असेल...? एनआयटी टॉपरला ४५ लाखांचे पॅकेज मिळाले अन् अचानक नोकरीवरून काढले...
11
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षावर दोन ग्रहणांचे सावट; श्राद्धविधीत होणार अडचण? 
12
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
13
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?
14
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
15
पवार काका-पुतण्यांना दे धक्का; NCP च्या दोन्ही गटातील दिग्गज नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश
16
Apoorva Mukhija : "मी सिंगल आहे, मला आता लग्न करायचंय; बॉयफ्रेंड शोधतेय, प्लीज कोणीतरी..."
17
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
18
जे कुणाला जमलं नाही ते टीम इंडियानं करून दाखवलं; इंग्लंडच्या मैदानात रचला इतिहास
19
कशापाई तू वारी हट्ट केलास रे बाळा.. आता मी घरी एकटीच जाऊ का; गोविंदासाठी आजीने फोडला हंबरडा
20
Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार तरुणपणी केलेल्या 'या' तीन चुका म्हातारपणी भोवतात!

शिवसेनेच्या संजय मंडलिकांना कार्यकर्त्यांची साद, एकनाथ शिंदेनाच द्यावा प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2022 16:39 IST

कार्यकर्त्यांचा पवित्रा हमिदवाडा कारखाना कार्यस्थळावर व्यापक बैठक

दत्तात्रय पाटील

कोल्हापूर/ म्हाकवे : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे प्रांजळ व्यक्तीमत्व आहे. मात्र, सध्याचे राजकारण हे निष्ठा आणि भावनिकतेवर होणार नाही. आपण सत्तेत गेलो तरच मतदारसंघात निधी खेचून आणून विकास करू शकतो. या विकास कामांच्या जोरावरच आपण पुढील निवडणूकातही यशस्वी होवू. त्यामुळे  खासदार संजय मंडलिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जावे.अशी आग्रही भूमिका मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांनी मांडली. खासदार मंडलिक यांनी शिंदे यांनाच पाठिंबा द्यावा असा दबाव गटही कार्यकर्त्यांनी निर्माण केला.        हमिदवाडा (ता.कागल)येथिल सदाशिवराव मंडलिक कारखाना कार्यस्थळावर मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांची व्यापक बैठक झाली.अध्यक्षस्थानी अतुल जोशी होते.यावेळी विरेंद्र मंडलिक यांनी कार्यकर्त्यांचा कल जाणून घेतला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांना हात उंचावून सर्वानीच पाठिंबा व्यक्त केला.  जिल्ह्याच्या राजकारणात मंडलिक यांच्या निर्णयाबाबत उलट-सुलट चर्चा सुरू होती. त्यामुळे या मेळाव्याकडे सर्वाचे डोळे लागले होते. मुरगुडचे नगराध्यक्ष राजे खान जमादार यांनी प्रास्ताविक केले यावेळी आर डी पाटील-कुरुकुलीकर, अतुल जोशी (कागल) सत्यजित पाटील (सोनाळी) एन एस चौगुले (सोनाळी),आनंदराव फराकटे (बोरवडे), भगवान पाटील (बानगे), अनिल सिद्धेश्वर (कुरणी), नामदेवराव मेंडके (मुरगुड) जयवंत पाटील (कुरुकली) सुधीर पाटोळे (एकोंडी), दत्ता कसलकर (हणबरवाडी) यांनी आपले विचार व्यक्त केले.यावेळी जि.प.सदस्या शिवानी भोसले, सदासाखरचे उपाध्यक्ष बापुसाहेब भोसले,केशव पाटील, प्रकाश पाटील, रामचंद्र सांगले,दिनकर पाटील, दत्तात्रय सोनाळकर,दत्तात्रय चौगले,शेखर सावंत,बालाजी फराकटे आदी उपस्थित होते.माजी सभापती विश्वास कुराडे यांनी आभार मानले.

निर्णयाचा चेंडू मंडलिक यांच्या कोर्टात...      १९६०पासून आम्ही मंडलिक गटाशी एकनिष्ठ आहोत. आमची दुसरी आणि तिसरी पिढी या गटात त्याच जोमाने गटाच्या अस्तित्वासाठी कार्यरत आहे. मतदारसंघात विकासाची गंगा तळागाळापर्यंत घेवून जाण्यासाठी सत्तेत सहभागी व्हावे असा आमचा आग्रह असून खासदार मंडलिक यांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावा. त्यांनी घेतलेल्या निर्णयाशी आम्ही ठाम राहु असा विश्वासही अनेक कार्यकर्त्यांनी दिला.

विचार विनिमयाचा शिरस्ता कायम...  लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांनी कोणताही राजकीय निर्णय घेताना कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करूनच निर्णय घेतले. अगदी तोच शिरस्ता कायम ठेवून खासदार संजय मंडलिक व विरेंद्र मंडलिक यांचीही वाटचाल सुरू आहे.कार्यकर्त्यांची मते आजमाविली याबाबतही अनेकांनी समाधान व्यक्त केले. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरEknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtraमहाराष्ट्रShiv Senaशिवसेना