शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
2
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
3
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
4
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
5
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
6
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
7
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
8
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
9
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
10
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
12
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
13
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
14
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
15
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
16
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
17
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
18
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
19
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
20
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

Marathon: कोल्हापूरकर उद्या धावणार.. 'लोकमत महामॅरेथॉन'चे नववे पर्व गाजवणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 13:51 IST

लाखांची बक्षिसे, धावपटूंची उत्सुकता पोहोचली शिगेला

कोल्हापूर : प्रचंड उत्सुकता लागून राहिलेल्या लोकमतकोल्हापूर महामॅरेथॉनच्या नवव्या पर्वाचा प्रत्यक्ष थरार उद्या रविवारी (दि. १६) पोलिस परेड मैदानावर सकाळी ६ वाजल्यापासून रंगणार आहे. या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी खेळाडूसह सर्वच स्तरांतील नागरिक, अधिकारी व्यावसायिक धावपटूंसह सर्वजण सहभागी होण्यासाठी आतूर आहेत. त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही नावनोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. राज्यासह परराज्यांतील व्यावसायिक धावपटूंनी नावनोंदणी करीत या महामॅरेथॉनला विशेष पसंती दिली आहे. बीब एक्पोचे उदघाटन आज शनिवारी होत आहे.कोल्हापुरात कसबा बावडा पोलिस परेड मैदानातून रविवारी सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी या महामॅरेथॉनला सुरुवात होणार आहे. सर्वच गटातील स्पर्धकांनी त्यासाठी जोरदार तयारी केली आहे. क्रीडा संघटना, ग्रुप, महिला मंडळ, क्लब, असोसिएशन, संस्था, उद्योग, कारखाने आणि विद्यार्थ्यांनी नोंदणीला प्राधान्य दिले आहे. अनेकांनी मित्रमंडळींसह सहकुटुंब महामॅरेथॉनचे बुकिंग केले आहे. बहुतांश फॅमिली रन करणारे ३ आणि ५ किलोमीटर शर्यतीत धावणार आहेत. वैयक्तिक धावणारे हौशी व व्यावसायिक धावपटू १० किलोमीटरच्या शर्यतीत सहभागी होणार आहेत. या सर्वांचा एक अनोखा मेळाच पोलिस परेड मैदानावर रंगणार आहे.

लोकमत महामॅरेथॉनचा मार्ग असा

  • ३ किलोमीटर : पोलिस ग्राउंड-धैर्यप्रसाद चौक- सर्किट हाऊस-पुन्हा धैर्यप्रसाद चौक-पितळी गणपती-डीएसपी चौक- पोलिस ग्राउंड (डावी आणि उजवी बाजू)
  • ५ किलोमीटर : - पोलिस ग्राउंड-धैर्यप्रसाद चौक-महासैनिक दरबार हॉल-पुन्हा धैर्यप्रसाद चौक-पितळी गणपती मार्गे- डीएसपी चौक-पोलिस ग्राउंड (डावी आणि उजवी बाजू)
  • १० किलोमीटर : - पोलीस ग्राउंड, धैर्यप्रसाद चौक-महासैनिक दरबार हॉल-पुन्हा धैर्यप्रसाद चौक-कावळा नाका-उड्डाण पूल, कावळा नाका, पितळी गणपती मार्गे-डीएसपी चौक-पोलीस ग्राउंड (कावळा नाका ते धैर्यप्रसाद चौक डावी बाजू)

लोकमत महामॅरेथॉन सुटण्याच्या वेळा / उपस्थित राहण्याची वेळ

  • १० किलोमीटर : सकाळी ६:३० वाजता / सकाळी ६ वाजता
  • ५ किलोमीटर : ६:४५ वाजता / सकाळी ६ वाजता
  • ३ किलोमीटर : ६:५५ वाजता / सकाळी ६ वाजता

लाखांची बक्षिसेमॅरेथॉनमध्ये १० किलोमीटरमधील विजेत्यांना वयोगटनिहाय मिळून रुपयांची बक्षिसे प्रदान केली जाणार आहेत, तर ३, ५ किलोमीटरमध्ये धावणाऱ्या स्पर्धकांना मेडल, प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे. महामॅरेथॉन झाल्यानंतर तिथेच थोड्याच वेळात मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात येणार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Ready for Lokmat Mahamarathon's Ninth Edition Tomorrow!

Web Summary : Kolhapur is set for the Lokmat Mahamarathon's ninth edition. Participants are eager for the race, which starts Sunday at 6:30 AM. The event includes 3km, 5km, and 10km races with prizes awarded. Registration saw a huge response from across states.