शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- उत्तरायण किरणोत्सव: मावळतीच्या किरणांचे अंबाबाईला सूर्यस्नान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 11:54 IST

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या उत्तरायण किरणोत्सवात बुधवारी सायंकाळी मावळतीच्या किरणांनी अंबाबाईच्या मूर्तीला सूर्यस्नान घातले. सायंकाळी ६ वाजून ...

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या उत्तरायण किरणोत्सवात बुधवारी सायंकाळी मावळतीच्या किरणांनी अंबाबाईच्या मूर्तीला सूर्यस्नान घातले. सायंकाळी ६ वाजून १८ मिनिटांनी सोनसळी किरणे देवीच्या चेहऱ्यावर आली आणि किरणोत्सवाच्या मुख्य दिवशीच किरणोत्सव सोहळा पूर्ण क्षमतेने झाला. यावेळी भाविकांनी अंबा माता की जयचा गजर केला. आज गुरुवार व शुक्रवारीदेखील किरणाेत्सव होणार आहे.करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या उत्तरायण किरणोत्सवाला मंगळवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी सूर्यकिरणांनी चरणस्पर्श केला. बुधवारी मात्र वातावरण स्वच्छ होते. हवेत धूलिकणदेखील कमी होते. वाऱ्याचा वेग योग्य होता. सूर्यकिरणांमध्ये प्रखरता होती. त्यामुळे किरणे थेट अंबाबाईच्या चेहऱ्यापर्यंत गेली. गेल्या वर्षभरात अंबाबाईचा किरणोत्सव पूर्ण क्षमतेने झाला नव्हता, यंदाही गेली दोन दिवस सूर्यकिरणे मंदिरात येईपर्यंत धूसर होत लुप्त होत होती. मंदिराचा खरा किरणोत्सव ३१ जानेवारी व १ व २ फेब्रुवारीला होतो. या तीन दिवसांतील मुख्य दिवशीच पूर्ण क्षमतेने किरणोत्सव झाल्याने भाविकांच्या आनंदाला पारावर उरला नाही. सायंकाळी ६ वाजून १८ मिनिटांनी किरणे मूर्तीच्या चेहऱ्यावर येऊन लुप्त झाली. त्यानंतर देवीची आरती करण्यात आली. यावेळी भाविकांनी अंबा माता की जयचा गजर केला. आज गुरुवारी व शुक्रवारीदेखील किरणोत्सव असून याच क्षमतेने सूर्यकिरणे प्रखर राहिल्यास किरणे पुन्हा मूर्तीच्या चेहऱ्यावर किंवा खांद्यापर्यंत येतील, अशी शक्यता प्रा. मिलिंद कारंजकर यांनी व्यक्त केली.

किरणांचा प्रवास असा..

  • महाद्वार रोड : ५ वाजून २८ मिनिटे
  • गरुड मंडप : ५ वाजून ३३ मिनिटे
  • गणपती मंदिर : ५ वाजून ३९ मिनिटे
  • कासव चौक : ५ वाजून ५८ मिनिटे
  • पितळी उंबरा : ६ वाजून ३ मिनिटे
  • चांदीचा उंबरा : ६ वाजून ७ मिनिटे
  • संगमरवरी पहिली पायरी : ६ वाजून ९ मिनिटे
  • कटांजन : ६ वाजून १३ मिनिटे
  • चरण स्पर्श : ६ वाजून १४ मिनिटे
  • गुडघ्यापर्यंत : ६ वाजून १५ मिनिटे
  • कमरेपर्यंत : ६ वाजून १६ मिनिटे
  • खांद्यापर्यंत : ६ वाजून १६ मिनिटे
  • चेहऱ्यावर : ६ वाजून १८ मिनिटे (नंतर लुप्त झाली.)
टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर