शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

नवी डोकेदुखी!, सोशल मीडियावरील प्रोफाइल हे जोडणारे नव्हे, तर लग्न मोडणारे..

By विश्वास पाटील | Updated: July 21, 2025 15:34 IST

मॅरेज ब्युरोकडील फेक प्रोफाइलमध्येही वाढ

विश्वास पाटीलकोल्हापूर : फेसबुक, इन्स्टावरील तुमचे प्रोफाइल पाहून लग्न जुळण्याचे नव्हे, तर मोडण्याचेच प्रमाण वाढू लागल्याचे अनुभव आहेत. स्थळ आले की मुली पटपट त्याचे सोशल मीडियावरील अकाउंटवर जाऊन त्याच्या वागणुकीची कुंडलीच काढू लागल्या आहेत. त्यामुळे तो घरी येऊन मुली पाहण्याचा कार्यक्रम होण्यापूर्वीच त्या स्थळाला नकार देऊ लागल्या आहेत. उपवर मुलींच्या आई-वडिलांसाठी ही नवी डोकेदुखी ठरत आहे, कारण मुलगी प्रत्येक स्थळाला नकार देऊ लागल्याने स्थळे शोधायची किती, असा पेच त्यांच्यासमोर आहे.कोल्हापुरातील तो तरुण, तसा देखणा. निर्व्यसनी. हायस्कूलमध्ये क्रीडाशिक्षक. त्यामुळे आर्थिक स्थिती चांगली; परंतु त्याच्या सोशल अकाउंटवर तो गणेशोत्सवात ट्रॅक्टरवर उभे राहून नाचताना सगळे फोटो. शिक्षक असूनही ट्रॅक्टरवर उभे राहून नाचत असेल, तर तो व्यसनी नसेल कशावरून, असा तर्क करून त्याला अडचणी.दुसरा एक अनुभव असा : ती मुलगी तशी चांगली शिकलेली. समज असलेली. तिला मुंबईत पुरवठा निरीक्षक असलेल्या तरुणाचे स्थळ आले. तिने त्या मुलाचे फेसबुक चेक केले. त्यात तो हिरवेगार पातळ कासोटा घालून नेसलेल्या आईसोबतचा फोटो होता. मुलीला वाटले, अरे रे... असली सासू आपल्याला मोकळीक देणार नाही. तिनेच अर्थ काढला आणि नकार दिला.

ज्या तरुणाचे स्थळ आले आहे, त्याचा सामाजिक वावर कुठे आहे, त्याची लाइफ स्टाइल कशी आहे, यासंबंधीची माहिती त्याची सोशल पोस्ट पाहून लक्षात येते. पुण्या-मुंबईकडील स्थळ असेल, तर कौटुंबिक माहिती मिळवणे शक्य होत नाही. अगदीच अनोळखी तरुणाशी लग्न कसे करायचे, हा आमच्या समोरील प्रश्न आहे. -एक उपवर तरुणी, शिवाजी पेठ, कोल्हापूर. 

सोशल मीडिया प्रोफाइल पाहणे हे गैर नाही; परंतु तुम्ही फक्त आवरण बघून निर्णय घेऊ नका. इमेज कॉशन्स असणाऱ्या मुलींनी त्याचे शिक्षण, आर्थिक स्थिती, वर्तन, व्यवहार, त्याचा दृष्टिकोन याचाही शोध घेतला पाहिजे. मुली एकाच व्यक्तीकडून सर्व प्रकारच्या नात्यांची अपेक्षा करू लागल्या आहेत आणि अपेक्षांचे वाढते ओझे लग्न जुळण्यास आणि झालेली लग्ने मोडण्यासही कारणीभूत ठरत आहेत. - अनुराधा मेहता, सदस्या, महिला दक्षता समिती, कोल्हापूर