शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

मराठा भवन; जागेसाठी चार वर्षे वणवण, प्रस्ताव मंत्रालयात धूळ खात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 15:40 IST

आरक्षणाच्या मागणीसाठी एक मराठा.. लाख मराठा अशा घोषणा देत मुठी आवळणारा समाजही या प्रश्नावर मूग गिळून गप्प बसला आहे.

विश्वास पाटीलकोल्हापूर : मराठा समाजाचे शैक्षणिक, सामाजिक विकासाचे केंद्र ठरावे अशा मराठा भवनचा जागेचा प्रस्ताव गेले चार वर्षे मंत्रालयात धूळ खात पडला आहे. या भवनच्या उभारणीसाठी समाजाने दिलेले ३२ लाख रुपये बँकेत पडून आहेत. सरकारकडून जागा देण्याचा निर्णय होत नसल्याने सगळेच काम ठप्प आहे.कोल्हापूरचे राजकारण, समाजकारण, सहकार, शेती, साखर कारखानदारीपासून एकूणच जिल्ह्याच्या कारभारावर या समाजाचे वर्चस्व आहे. परंतु, तरीही या समाजाच्या प्रातिनिधिक संस्थेला सरकारकडून जागा मिळवून देता आलेले नाही. यासारखे मोठे दुर्दैव नाही अशी भावना या समाजातून व्यक्त होत आहे.अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष वसंत मुळीक यांच्या पुढाकारातून मराठा भवन उभारणीसाठी प्रयत्न सुरू आहेत. हे भवन व्हावे यासाठी मुळीक धडपडत आहेत; परंतु समाजाची ताकद त्यांच्या मागे उभी राहिल्याशिवाय हे भवन उभारणे शक्य नाही. आरक्षणाच्या मागणीसाठी एक मराठा.. लाख मराठा अशा घोषणा देत मुठी आवळणारा समाजही या प्रश्र्नावर मूग गिळून गप्प बसला आहे.यासाठी मराठा स्वराज्य भवन ट्रस्ट संस्थेकडून जागा मागणीचा मूळ अर्ज २०१४ मध्ये तत्कालीन भाजप सरकारकडे करण्यात आला. तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे महसूल मंत्रीही होते. त्यामुळे त्यांनी मनावर घेतले असते तर चुटकीसरशी हा निर्णय होऊ शकला असता, परंतु त्यांनी कोणत्याही संस्थेला जागा न देण्याचा भाजप सरकारचा निर्णय असल्याचे सांगून मी तुम्हाला जागेसाठी तीन कोटी रुपये देतो, त्यातून जागा विकत घ्या असा सल्ला दिला.परंतु हे तीन कोटीही मिळाले नाहीत व जागाही मिळालेली नाही. चार वर्षांपूर्वी आयटी पार्क शेजारी शासनाची रि.स.नं ६९७-अ मध्ये जागा उपलब्ध आहे. ती ९९ वर्षांच्या कराराने द्यावी, असा परिपूर्ण प्रस्ताव पाठविला. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे १२ जानेवारी २०२० ला नव्याने पत्रव्यवहार केला; परंतु गेल्या दोन वर्षांत त्यावर कोणताच निर्णय झालेला नाही.

एका खोलीतून काम..सांगली, बेळगाव, हैद्रराबाद अशा विविध ठिकाणी मराठा भवनच्या वास्तू यापूर्वीच उभ्या राहिल्या आहेत. परंतु, कोल्हापुरात मात्र त्यासाठी मराठा समाजाला झगडावे लागत असल्याचा अनुभव आहे. सध्या मराठा समाज संघटनेचे काम मुळीक यांच्या मंगळवार पेठेतील घरातील एका छोट्या खोलीतून चालते. एकूण मराठा समाजालाही मान खाली घालायला लावणारी गोष्ट आहे. परंतु, कोल्हापूरच्या जनतेला व नेतृत्वासह लोकप्रतिनिधी, समाजधुरीणांही त्याचे काहीच वाटत नाही.

पालकमंत्र्यांची जबाबदारीमराठा भवनसाठी जागा मिळवून देण्याची जबाबदारी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावरच आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री पाटील यांनी मोट बांधली तर ते मराठा भवनच काय, नवीन जिल्हा स्थापन करू शकतील एवढी त्यांची राजकीय ताकद आहे. त्यामुळे त्यांनीच या जागेसाठी ही ताकद पणाला लावण्याची गरज आहे. एखादी बैठक घेतल्याने हा प्रश्न मार्गी लागणार नाही.कसे असेल मराठा भवन..मराठा समाजाच्या विकासाचे आणि शिवशाहूंच्या विचाराचे केंद्र व्हावे असा भवनचा आराखडा आहे. त्यामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, वसतिगृह, ग्रंथालय, सांस्कृतिक सभागृह, शेतीविषयक मार्गदर्शन केंद्र असे त्याचे स्वरूप असेल. जागा मिळाल्यावर मराठा समाजाचे हजारो लोक असे आहेत की ते प्रत्येकी लाख रुपयांची मदत करायला तयार आहेत. पापा बागवान यांच्यासारख्या व्यक्तीने मराठा समाजाच्या पाठबळामुळे आम्ही कोल्हापुरात उभा राहिलो म्हणून लाख रुपयांची देणगी स्वत:हून आणून दिली आहे. असे अनेक समाज मराठा भवनसाठी मदत करू शकतात. परंतु, जागाच नसल्याने सगळेच काम थांबले आहे.

मराठा भवन व्हावे यासाठी आम्ही गेल्या सहा वर्षांपासून प्रयत्न करत आहोत. परंतु, जागेअभावी सर्व काही ठप्प झाले आहे. पालकमंत्री सतेज पाटील जागा मिळवून देण्याबाबत प्रयत्नशील आहेत. शिव-शाहूंच्या विचारांचे हे भवन होण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा. - वसंतराव मुळीक, राष्ट्रीय उपाध्यक्ष, अखिल भारतीय मराठा महासंघ

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmarathaमराठाMaratha Reservationमराठा आरक्षण