शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

..अखेर कुंभी कासारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगुल वाजले, जाणून घ्या निवडणूक कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 18:51 IST

प्रकाश पाटील कोपार्डे : कुंभी कासारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा अखेर बिगुल वाजला. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या ...

प्रकाश पाटीलकोपार्डे : कुंभी कासारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा अखेर बिगुल वाजला. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या ६ जानेवारी पासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच व्यूव्हरचना आखण्यासाठी सत्ताधारी व विरोधी गटांच्या प्रमुख कार्यकर्त्याच्या बैठका सुरू झाल्या आहेत.२९ नोव्हेंबरला सभासदांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली होती. पण शासनाने राज्यात सुरू असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमुळे सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणूका २० डिसेंबर पर्यंत पुढे ढकलल्या होत्या. औरंगाबाद खंडपीठाने सहकारी संस्थांच्या ज्या टप्प्यावर निवडणूक थांबवण्यात आल्या होत्या. त्या टप्यावरून निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिल्याने २१ डिसेंबर पासून निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरू करून निवडणूक अधिकारी म्हणून करवीरचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर व साहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून प्रदिप मालगावे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक कार्यक्रम कालावधी ३५ दिवसाचा करण्यात आला आहे.डिसेंबर २०२० मध्ये विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपली होती. पण कोरोना, पावसाळ्यामुळे निवडणूक तब्बल दोन वर्षे पुढे ढकलली. नोव्हेंबर महिन्यात निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. कच्ची मतदार यादीवर हरकती होऊन २९ नोव्हेंबरला २३ हजार ६४  सभासद व ब वर्ग सभासद ३६४ अशी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती.निवडणूक लागणार की आणखी लांबणीवर पडणार याबाबत तर्कवितर्क सुरू होते.आता निवडणूक कार्यक्रम अधिकृत जाहीर झाल्याने याला पूर्ण विराम मिळाला आहे.

असा असेल निवडणूक कार्यक्रमउमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी -६ ते १२ जानेवारी २०२३उमेदवारी अर्ज छाननी - १३ जानेवारीवैध,अवैध नामनिर्देशन व अंतिम उमेदवार यादी -१६ जानेवारीउमेदवारी अर्ज माघार -१७ ते ३० जानेवारीचिन्ह वाटप - ३१ जानेवारीमतदान - १२ फेब्रुवारीमतमोजणी - १४ फेब्रुवारी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूक