शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात एकाने थुंकीमुक्त कार्यकर्त्यास मारहाण केली, पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 11:47 IST

पाहुणचार होताच सूर बदलला

कोल्हापूर : रस्त्यावर थुंकू नका, असे सांगणाऱ्या थुंकीमुक्त कोल्हापूर चळवळीतील कार्यकर्त्यास मारहाण करणारा रितेश गणेश मछले (वय २८, रा. मोतीनगर, राजेंद्रनगर, कोल्हापूर) याला राजारामपुरी पोलिसांनी अद्दल घडवली. पोलिसांचा प्रसाद मिळताच मछले याने हात जोडून माफी मागितली. तसेच कोल्हापूर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले. आधी दमदाटी आणि नंतर हात जोडून माफी मागणारा त्याचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाला आहे.शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सुरू झालेली थुंकीमुक्त कोल्हापूर चळवळ हळूहळू वाढत असताना, त्याला खो घालणाऱ्या काही नतदृष्टांचाही सामना चळवळीतील कार्यकर्त्यांना करावा लागत आहे. सोमवारी दुपारी एकच्या सुमारास जवाहरनगर येथील पेट्रोल पंपाजवळ थांबलेले काही तरुण रस्त्यावर थुंकीच्या पिचकाऱ्या मारत होते. त्यावेळी थुंकीमुक्त चळवळीतील कार्यकर्ते बृहस्पती हिरभाऊ शिंदे (वय ४८, रा. सम्राटनगर, कोल्हापूर) यांनी तरुणांना रस्त्यावर थुंकू नका, असे सांगितले. याचा राग आल्याने रितेश मछले याने शिंदे यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. काय करायचे ते कर, कुठेही तक्रार कर, आम्ही कुणाचे ऐकणार नाही, असे म्हणत तो दमदाटी करीत होता. याबाबत शिंदे यांनी सोमवारी राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.पाहुणचार होताच सूर बदललाफिर्यादी शिंदे यांनी मोबाइलवर केलेल्या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी रितेश मछले याला मंगळवारी ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने चूक कबूल करीत पुन्हा असा प्रकार करणार नसल्याची ग्वाही दिली. तसेच थुंकीमुक्त कोल्हापूर चळवळीसाठी सगळ्यांनी योगदान देण्याचे आवाहन केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस