शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात ‘सीपीआर’मध्ये आरोपींना पोलिसांनी संभाषणासाठी पुरवले मोबाइल, विशेष ट्रीटमेंट पाहून उपस्थित आचंबित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 13:14 IST

संशयितांना वैद्यकीय चाचणीसाठी सीपीआरच्या अपघात विभागात आणले होते

कोल्हापूर : गोरक्षकाचा पाठलाग करून त्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी अटकेतील चार संशयितांना पेठ वडगाव पोलिसांनी विशेष ट्रीटमेंट पुरवली. न्यायालयीन कोठडीत रवानगी झालेल्या संशयितांना वैद्यकीय चाचणीसाठी सीपीआरमध्ये आणले असता, त्यांना पोलिसांच्या परवानगीने मोबाइल पुरवण्यात आला. पोलिसांच्या समोरच संशयित मोबाइलवर गप्पा मारत होते. पोलिसांकडून संशयितांना दिल्या जाणाऱ्या खास ट्रीटमेंटने सीपीआरमधील उपस्थितांचे लक्ष वेधले. हा प्रकार बुधवारी (दि. १६) सायंकाळी घडला.चार दिवसांपूर्वी किणी टोल नाका येथे एका गोरक्षकास तीन ते चार जणांनी पाठलाग करून बेदम मारहाण केली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पेठ वडगाव पोलिसांनी तिघांना अटक केली. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर तिन्ही संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. त्यानंतर कारागृहात सोडण्यापूर्वी संशयितांना बुधवारी सायंकाळी वैद्यकीय चाचणीसाठी सीपीआरच्या अपघात विभागात आणले होते. सीपीआरमध्ये पोहोचताच संशयितांना नातेवाईक आणि मित्रांनी गराडा घातला. पोलिसांच्या परवानगीने संशयितांना मोबाइल मिळाले. त्यानंतर वैद्यकीय चाचणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत संशयितांच्या मोबाइलवरून गप्पा सुरू होत्या. बेड्या घातलेल्या संशयितांना पोलिसांकडून मिळत असलेली विशेष ट्रीटमेंट पाहून उपस्थित आचंबित झाले. पोलिस कोठडीत संशयितांची चौकशी झाली की सरबराई झाली, अशीही चर्चा परिसरात सुरू होती.याबाबत कर्तव्यावर असलेले पोलिस कर्मचारी पी. एम. तांबे यांना विचारणा केली असता, त्यांनी चूक कबूल केली. पेठ वडगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक भैरू तळेकर यांच्याकडे विचारणा केल्यानंतर, त्यांनी हा प्रकार गंभीर नसल्याचे सांगत मोबाइल वापरणारे संशयित आरोपी आणि त्यांना मोबाइल वापरास मुभा देणाऱ्या पोलिसांची पाठराखण केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस