शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
6
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
7
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
8
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
9
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
10
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
11
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
12
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
13
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
14
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
15
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
16
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
17
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
18
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
19
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
20
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...

पक्षाशी झाले गद्दार, कोल्हापूरकरांनी 'या' नेत्यांना केले हद्दपार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 18:36 IST

पोपट पवार  कोल्हापूर : ‘एक पक्ष, एक झेंडा अन् एकच विचार’ घेऊन निष्ठेच्या पखाली वाहणारे नेते बदलत्या राजकारणात दुर्मीळ ...

पोपट पवार कोल्हापूर : ‘एक पक्ष, एक झेंडा अन् एकच विचार’ घेऊन निष्ठेच्या पखाली वाहणारे नेते बदलत्या राजकारणात दुर्मीळ होत असताना एका रात्रीत पक्ष बदलून निष्ठा खुंटीवर टांगणाऱ्यांची मात्र सध्या भलतीच चलती आहे. झाडून सर्वच पक्षांतील आयाराम-गयारामांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात १९८०-८५ पर्यंत एकाच पक्षात राहून पक्षनिष्ठा वाहणारे असंख्य होते. मात्र, पुढे बदलत्या राजकारणात अनेकांनी सोयीच्या भूमिका घेतल्या. नेत्यांची ही भूमिका जनतेने मात्र स्वीकारली नसल्याचे त्यांच्या निवडणुकांमधील निकालावरून दिसते.देसाई यांनी पक्ष बदलला अन् पराभव झालापूर्वी कोल्हापूर शहरामध्ये शिवसेनेचा दबदबा होता. याच काळात १९९० मध्ये कोल्हापूर मतदारसंघातून शिवसेनेकडून दिलीप देसाई हे विजयी झाले होते. मात्र, तत्कालीन शिवसेना नेते छगन भुजबळ यांनी पक्षात बंड करून काँग्रेसची वाट धरल्याने देसाई यांनीही भुजबळ यांना साथ देत शिवसेना सोडली. पुढे १९९५ मध्ये झालेल्या निवडणुकीत देसाई यांचे हे पक्षांतर जनतेला रुचले नाही. त्यांनी सुरेश साळोखे या शिवसैनिकाला विधानसभेत पाठवत देसाई यांना घरी बसवले.बाबासाहेब पाटील यांचाही पराभवशाहूवाडी मतदारसंघातून बाबासाहेब पाटील-सरुडकर हे १९९० मध्ये शिवसेनेकडून विधानसभेत गेले होते. तेही भुजबळ यांच्या बंडात सहभागी झाले. पुढे १९९५ च्या निवडणुकीत येथील जनतेने अपक्ष रिंगणात उतरलेल्या संजयसिंह गायकवाड यांना गुलाल लावत सरुडकर यांचे पक्षांतर मान्य नसल्याचा संदेश दिला.उमेदवार नव्हे, पक्ष बलवान, कारखानीस यांनी घेतला धडाकोल्हापूर शहरातून तीनवेळा व शाहूवाडीतून एकवेळा शेकापकडून आमदार राहिलेले त्र्यंबक सीताराम कारखानीस हे त्या काळातील जिल्ह्यातील बडे प्रस्थ. १९८५ च्या निवडणुकीत कारखानीस यांनी शेकापला सोडचिठ्ठी देत काँग्रेसची वाट धरली. मात्र, तेथेही त्यांना उमेदवारी न मिळाल्याने ते अपक्ष रिंगणात उतरले. पण, जनतेने त्यांचा अभूतपूर्व मतांनी पराभव केला. या निवडणुकीत शेकापकडून एन. डी. पाटील यांनी विजय मिळविला होता.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024