शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Ambabai (Mahalaxmi) Temple: अंबाबाई मंदिराचे मूळ स्वरूप ४६ वर्षांनी येणार प्रकाशात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 11:29 IST

वास्तुकलेचा अजोड नमुना असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराचे मूळ दगडी बांधकाम तब्बल ४६ वर्षांनी प्रकाशात येणार आहे.

कोल्हापूर : वास्तुकलेचा अजोड नमुना असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराचे मूळ दगडी बांधकाम तब्बल ४६ वर्षांनी प्रकाशात येणार आहे. या बांधकामावर लावण्यात आलेली संगमरवरी फरशी काढण्याच्या कामाला मंगळवारी सुरुवात झाली असून, महिन्याभरात भाविकांना मंदिराचे सौंदर्य पाहता येणार आहे.

अंबाबाई मंदिराचे हेमाडपंथी बांधकाम आहे जे अतिशय मजबूत असून, त्यावर सुरेख नक्षीकाम आहे; पण १९७६ च्या सुधारणांच्या काळात संगमरवरी फरशीचे आकर्षण असल्याने भाविकांनी दिलेल्या देणगीतून गाभाऱ्यासह पूर्ण परिसरातील भिंतींना व जमिनीवर या फरशा बसवण्यात आल्या. या फरशीमुळे मूळ दगडांचे झरोखे बंद होऊन उष्णता वाढली. शिवाय दगडाचे मूळ सौंदर्यदेखील झाकोळले गेले.

मात्र, जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी प्रशासक म्हणून कार्यभार स्वीकारल्यापासून सचिव शिवराज नाईकवाडे यांच्या मदतीने मंदिर सुधारणा व मुळ स्वरूप उजेडात आणण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून हेरिटेज कमिटीने सुचवल्याप्रमाणे संगमरवरी फरशी काढण्याचा निर्णय घेण्यात आला. मंगळवारी सचिव नाईकवाडे यांच्या हस्ते साहित्यांचे पूजन करून या कामाची सुरुवात करण्यात आली. यावेळी हेरिटेज कमिटीच्या अध्यक्षा अमरजा निंबाळकर, अंबाबाई मंदिराचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्यासह देवस्थान समितीचे कर्मचारी उपस्थित होते.नगारखाना व मणिकर्णिकेचेही काम

नगारखान्याचे बांधकाम ढासळत असून, पावसाळ्यापूर्वी त्याची पुनर्बांधणी करून संरक्षित करणे गरजेचे आहे. तसेच मणिकर्णिका कुंडाची दत्त मंदिरामागील बाजू धोकादायक झाल्याने येथे भिंत बांधण्यात येणार आहे. ही दोन्ही कामे पुढील आठवड्यात सुरू करण्यात येणार आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर