कोल्हापूर : उद्धव ठाकरे हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या जाळ्यात पूर्णपणे अडकले आहे. त्यामुळेच शिवसेना संपत चालली तरी त्यांना त्याचे भान नाही अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. तसेच विरोधकांना निवडणुकांसाठी उमेदवार ही मिळणार नाहीत असा दावाही त्यांनी यावेळी केला. कोल्हापुरात आज, शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.बावनकुळे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यासाठी प्रचंड काम करत आहेत. याच कामगिरीच्या जोरावर लोकसभेसाठी ४५ हून अधिक आणि विधानसभेसाठी २०० हून अधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे. आमच्या विरोधकांना या निवडणुकांसाठी उमेदवार ही मिळणार नाहीत असा दावा बावनकुळे यांनी यावेळी केला. काचेच्या केबिनमध्ये बसल्यामुळे राज्यात उद्योग आले नाहीतकोरोनाच्या काळामध्ये काचेच्या केबिनमध्ये उद्धव ठाकरे बसल्यामुळे राज्यात उद्योग आले नाहीत हे वस्तुस्थिती आहे. राहुल गांधी यांची महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा सुरू असताना सातारा जिल्ह्यातील बाराशे काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला हे वास्तव आहे.राष्ट्रवादीला दिलं खुले आव्हानहिम्मत असेल तर बहुमताची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने करावी असे खुले आव्हान त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दिले. आमचे १६४ वरून १८४ होतील असा दावाही त्यांनी यावेळी केला.
विरोधकांना निवडणुकांसाठी उमेदवार ही मिळणार नाहीत, चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा
By समीर देशपांडे | Updated: November 12, 2022 13:23 IST